scorecardresearch

भारतात iPhone 15 Series च्या प्री बुकिंगला सुरुवात; ‘या’ मॉडेल्सवर मिळतोय ५ हजारांचा कॅशबॅक, ऑफर्स एकदा पाहाच

अ‍ॅपल कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे.

आयफोन 15 सिरीजचे प्री-बुकिंग
आयफोन १५ सिरीजमधील चारही मॉडेल्स तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. (Image Credit-Apple)

अ‍ॅपल कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन ५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. काल म्हणजेच १५ सप्टेंबरपासून आयफोन १५ सीरिजचे प्री-बुकिंग सुरु झाले आहे. भारतात देखील खरेदीदार याचे प्री-बुकिंग करू शकतात. त्यांना हे फोन लॉन्चिंग ऑफर्समुळे कमी किंमतीत मिळू शकतात. अधिकृत विक्री ही २२ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. तर नवीन आयफोन्सच्या भारतातील किंमती आणि त्यावर कशाप्रकारे डिस्काउंट ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.

iPhone 15: भारतातील किंमत

आयफोन १५ सिरीजमधील बेस मॉडेल असलेला आयफोन १५ तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ७९,९०० रुपये आहे. तसेच २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८९,९०० रुपये तर ५१२ जीबी मॉडेलची किंमत १,०९,९०० रुपये आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

हेही वाचा : आता चॅटिंग होणार आणखी सुरक्षित; वापरकर्त्यांसाठी WhatsApp आणणार ‘हे’ फिचर, जाणून घ्या

iPhone 15 Plus : भारतातील किंमत

आयफोन १५ प्लस देखील तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ८९,९०० रुपये आहे. तसेच २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९९,९०० रुपये तर ५१२ जीबी मॉडेलची किंमत १,१९,९०० रुपये आहे.

iPhone 15 Pro : भारतातील किंमत

Apple कंपनीने आयफोन १५ सिरीजमध्ये दोन प्रो मॉडेल्स लॉन्च केले आहेत. यामध्ये आयफोन १५ प्रो हा तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. यातील १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १,३४,९०० रुपये आहे. तसेच २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,४४,९०० रुपये तर ५१२ जीबी मॉडेलची किंमत १,८४,९०० रुपये आहे.

iPhone 15 Pro Max: भारतातील किंमत

आयफोन १५ प्रो मॅक्स हे १५ सिरीजमधील सर्वात शेवटचे मंडले आहे. हे देखील कंपनीने तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहेत. २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट असलेल्या मॉडेलची किंमत १,५९,९०० रुपये , २५ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत १,७९,९०० आणि १ टीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत १,९९,९०० रुपये आहे.

हेही वाचा : आता जगभरात भारताचा डंका; iPhone 15 सिरीजच्या ‘या’ मॉडेल्समध्ये ISRO चे GPS; जाणून घ्या…

भारतातील आयफोन १५ सिरीजवरील ऑफर्स

आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस HDFC बँकेच्या खरेदी कार्डाच्या व्यवहारांवर खरेदीदारांना फ्लिपकार्टवर ५ हजारांच्या डिस्काउंट ऑफरसह उपलब्ध आहे. ज्यांच्याजवळ HDFC चे डेबिट कार्ड आहे त्यांनी EMI पर्याय निवडल्यानंतर या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. फ्लिपकार्ट आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स वर अशा ऑफर्स देत नाही आहे.

खरेदीदार Apple च्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवरून देखील आयफोन खरेदी करू शकतात. कंपनीने आयफोन १५ प्रो , आयफोन १५ प्रो मॅक्स मॉडेलवर डिस्काउंट आणि कॅशबॅकची घोषणा केली आहे. HDFC बँकेचे कार्ड वापरणारे ६ हजारांच्या डिस्काऊंटचा आनंद घेऊ शकतात. नॉन प्रो मॉडेलवर ५ हजारांचा कॅशबॅक ऑफर आहे. कंपनी जुन्या आयफोन मॉडेल्सवर बँक डिस्काउंट ऑफर देखील देत आहे. ज्यामध्ये आयफोन १४ आणि १४ प्लसवर ४ हजार रुपये, आयफोन १३ वर ३ हजार रुपये आणि आयफोन SE वे २ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2023 at 10:20 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×