IRCTC Ticket Booking: रेल्वेने प्रवास करणाऱ्या करोडो प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. तुम्हीही ट्रेनमध्ये रिजर्वेशन केल्यास, आता तुम्ही आणखी सोप्या पद्धतीने स्वतःसाठी सीट बुक करू शकता. आता तुम्हाला तिकीट बुक करण्यासाठी IRCTC अॅपवर जाण्याची गरज नाही (IRCTC Train Ticket Booking), तुम्ही अॅपवर लॉग इन न करता तुमचे तिकीट बुक करू शकता. कसे ते जाणून घ्या. IRCTC APP शिवाय तिकीट बुक करता येते IRCTC कडून प्रवाशांना अनेक विशेष सुविधा दिल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही IRCTC चॅटबॉटवरूनच आरक्षण करू शकता. रेल्वेकडून ग्राहकांसाठी खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. हे फिचर नुकतेच सादर करण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत तुम्ही सहज तिकीट बुक करू शकता. ( हे ही वाचा: बॅक पॅनेलमध्ये इयरबड्स असलेला Nokia 5710 XpressAudio अनोखा फोन भारतात लाँच; किंमत असेल फक्त ४९९९) दररोज १० लाख लोक तिकीट बुक करतात IRCTC च्या वेबसाइटनुसार, सध्या वेबसाइटवरून दररोज १० लाखांहून अधिक लोक रिजर्वेशन करतात. याशिवाय प्रवासी अॅप आणि स्टेशनच्या माध्यमातूनही तिकीट काढतात आणि अनेक वेळा वेबसाईट नीट काम करत नसल्याने लोकांना वेळेवर तिकीट मिळू शकत नाही, हे लक्षात घेऊन रेल्वेने चॅटबॉटची सुविधा सुरू केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सुविधेत तुम्हाला कोणतेही वेगळे शुल्क द्यावे लागणार नाही, जेवढे शुल्क तुम्हाला वेबसाइटवर तिकीट बुक करण्यासाठी द्यावे लागेल, तेवढेच शुल्क तुम्हाला चॅटबॉटवर द्यावे लागेल. ( हे ही वाचा: आता iPhone 13 आणि iPhone 12 कमी किंमतीत खरेदी करण्याची सुवर्ण संधी; फक्त ‘या’ दिवसाची वाट पाहावी लागेल) किती चार्ज आकारला जातो? तिकीट बुक करताना स्लीपर क्लाससाठी १० रुपये आणि एसी क्लाससाठी १५ रुपये खर्च करावे लागतील. दुसरीकडे, तुम्ही UPI द्वारे पेमेंट केल्यास, तुम्हाला स्लीपर क्लाससाठी २० रुपये आणि एसी क्लाससाठी ३० रुपये द्यावे लागतील.