पीटीआय, बंगळूरु

भारताच्या चंद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे चांद्रभूमीवर निद्रावस्थेत गेल्यानंतर आता ते पुन्हा जागृती होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही, असे एका ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञाने शुक्रवारी सांगितले. त्यामुळे ही मोहीम आता जवळपास संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत.

अंतराळ आयोगाचे सदस्य आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले की, हे लँडर आणि रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता दिसत नाही. तसे जर व्हायचे असते तर, आतापर्यंत झाले असते. आता ते घडण्याची कोणतीही शक्यता नाही.किरणकुमार हे चंद्रयान-३ मोहिमेत सक्रिय सहभागी होते.चंद्रावर नवा दिवस सुरू झाल्यानंतर इस्रोने २२ सप्टेंबर रोजी म्हटले होते की, सौर ऊर्जेवर चालणारे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना पुन्हा कार्यान्वत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडून अद्याप तरी कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पुष्पगुच्छ द्यायला उशीर, मंत्र्याने अंगरक्षकाच्या श्रीमुखात भडकावली, VIDEO पाहून लोकांचा संतापपुष्पगुच्छ द्यायला उशीर, मंत्र्याने अंगरक्षकाच्या श्रीमुखात भडकावली, VIDEO पाहून लोकांचा संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-३ चे विक्रम लँडर यशस्वीरीत्या उतरले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. त्याचप्रमाणे चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग साध्य करणारा भारत हा अमेरिका, सोव्हिएत रशिया महासंघ (तत्कालीन) आणि चीननंतर चौथा देश ठरला आहे.