भारतात ५जी लाँच झाल्यानंतर जिओकडुन ५जी सुविधा लगेच सुरू करण्यात आली. पण ५जी रिचार्ज प्लॅनची किंमत किती असणार आहे आणि त्यावर कोणते ऑफर देण्यात येणार आहेत याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे जिओ ग्राहक या माहितीच्या प्रतिक्षेत होते. त्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. जिओने ५जी रिचार्ज प्लॅन्सची किंमत जाहीर केली असून स्वस्त किंमतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या या प्लॅन्सबरोबर ओटीटी फ्री सब्सक्रिप्शन असे आकर्षक ऑफर देण्यात येत आहेत. या प्लॅन्सची किंमत जाणून घ्या.

जिओचे ५जी रिचार्ज प्लॅन्स :

  • जिओच्या ५जी रिचार्ज प्लॅनची किंमत ३९९, ५९९,९९९ आणि १,४९९ रुपये आहे.
  • हे सर्व प्लॅन्स पोस्टपेड आहेत.
  • या प्लॅन्सबरोबर नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, डिज्नीप्लस हॉटस्टार यांचे मोफत सबस्क्रीप्शन मिळते.
  • अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा यात उपलब्ध होते.
  • ५९९ रुपयांचा प्लॅनमध्ये एक्स्ट्रा सिमची सुविधा उपलब्ध आहे, तर ९९९ रुपयांच्या प्लॅन ‘फॅमिली प्लॅन’ आहे.
  • १४९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर काही निवडक शहरांसाठी इंटरनॅशनल कॉलेजवर विशेष ऑफर देण्यात आली आहे.

Free Diwali Gifts : चिनी दिवाळी गिफ्टस् पासून सावधान; वेबसाईटवरून होत आहे डेटाची चोरी, ‘सीईआरटी’ची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर तुमच्या फोनवर ५जी कनेक्टिव्हिटी उपलब्ध असेल, तर तुम्हाला आपोआप जिओ ५जी वेलकम ऑफरवर अपग्रेड केले जाईल. या ऑफरअंतर्गत तुम्ही ‘१जीबीपीएस’च्या स्पीडवर अनलिमिटेड ५जी डेटा वापरू शकता. या प्लॅनचा वापर करण्यासाठी तुमचा ॲक्टिव्ह प्लॅन २३९ रुपयांचा किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीचा असणे गरजेचे आहे.