जिओ लवकरच आपले शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप ‘प्लाटफॉर्म’ युजर्ससाठी उपलब्ध करणार आहे. या अ‍ॅपमुळे रिल्स फीचरसाठी लोकप्रिय असलेल्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामला तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. यासाठी जिओने रोलिंग स्टोन इंडिया आणि क्रिएटिव्ह लँड एशियासोबत भागिदारी केली आहे. युजरला चांगला अनुभव देणे आणि त्यास क्रिएटिव्हिटीसह कमाई करण्याची संधी देणे हा अ‍ॅप काढण्यामागचा कंपनीचा हेतू आहे.

इन्स्टाग्राम रिल्ससारखे असेल

प्लाटफॉर्म गायक, संगितकार, अभिनेता, कॉमेडियन, नर्तक, फॅशन डिजाइनर्स आणि इतर क्रिएटर्ससाठी फायदेशीर ठरेल. सध्या या अपॅची बिटा टेस्टिंग होत असून जानेवरी महिन्यात हे अ‍ॅप युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. काही अहवालांनुसार, अ‍ॅपवरील प्रथम संस्थापक सदस्यांना आमंत्रणाद्वारे अ‍ॅपमध्ये प्रवेश दिला जाईल आणि त्यांच्या प्रोफाईलवर गोल्डन टीक व्हेरिफिकेशन दिले जाईल. हे सदस्य नवीन कलाकार सदस्यांना रेफरल प्रोग्रामद्वारे साइन अप करण्यासाठी आमंत्रित करण्यास पात्र असतील आणि अ‍ॅपमधील नवीन फीचर्सचे पूर्वावलोकन इतरांपूर्वी त्यांना करत येईल.

(Bluebugging: ब्लूटूथ सुरू ठेवणे पडू शकते महागात, डेटा होऊ शकतो चोरी)

काही मीडिया संकेतस्थळांनी कोट केलेल्या प्रेस रिलीजनुसार, प्लाटफॉर्ममध्ये क्रिअटरची पेड अल्गोरिदम ऐवजी रँक आणि प्रतिष्ठेद्वारे वाढ होईल. यामुळे कालांतराने क्रिएटरच्या कंटेंटला नैसर्गिकरित्या पैसा मिळेल. सिल्व्हर, ब्ल्यू आणि रेड टीकद्वारे निर्मात्यांना वेगेळे केले जाईल, जे चाहत्यांची संख्या आणि कंटेंट एन्गेजमेंटवर आधारित असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅपवरील सर्व निर्मात्यांच्या प्रोफाइल्सवर ‘बुक नाऊ’ बटन असेल. या बटनद्वारे युजरला कलाकारांशी संवाद साधता येईल. निर्मात्यांना रोलिंग स्टोन इंडिया डिजिटल एडिटोरिएलमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. त्यांना प्रिमियम व्हेरिफिकेशन मिळेल आणि इन अ‍ॅप बुकिंगच्या माध्यमातून युजरच्या कौशल्याला मुल्यही मिळेल.