भारतातील सर्व मोठ्या टेलिकॉम कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यात मग्न आहेत. सर्व कंपन्या आपल्या ग्राहकांना एकापेक्षा जास्त ऑफर देत आहेत. अशा परिस्थितीत रिलायन्स जिओने आपल्या एका रिचार्ज प्लॅनमध्ये शंभर रुपयांची कपात केली आहे. तुम्हीही रिलायन्स जिओचे प्रीपेड ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. कंपनीने आपल्या एका रिचार्ज प्लॅनच्या किमतीत १०० रुपयांनी कपात करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.वास्तविक, अलीकडेच कंपनीने आपल्या तीन प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर जिओने या प्लॅनची ​​किंमत कमी केली. तुम्हालाही या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर येथून तुम्ही या प्लॅनची ​​सर्व माहिती जाणून घ्या.

रिपोर्टनुसार, जिओचा हा २८ दिवसांचा वैधता प्लॅन आधी ६०१ रुपयांमध्ये उपलब्ध होता, तर आता हा प्लॅन १०० रुपयांनी कमी करून ४९९ रुपयांवर आला आहे.

(हे ही वाचा: तुमचे WiFi कनेक्शन स्लो होत आहे का? जाणून घ्या कारण आणि महत्त्वाच्या गोष्टी)

४९९ रुपयांच्या पॅकमध्ये काय मिळेल?

४९९ रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज २ GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, १०० SMS दररोज मिळतात. एवढेच नाही तर या प्लॅनसह कंपनी तुम्हाला Disney + Hotstar चे १ वर्षाचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

२८ दिवसांच्या वैधतेचा हा प्लॅन डिसेंबर २०२१ मध्ये प्रीपेड रिचार्जचे टॅरिफ दर वाढण्यापूर्वी केवळ ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध होता, परंतु दर वाढल्यानंतर ६०१ रुपये झाला. तर आता, पुन्हा जुन्या दराने उपलब्ध केला जात आहे.

(हे ही वाचा: Airtel चा ‘हा’ आहे सर्वात स्वस्त वार्षिक रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या फायदे)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६०१ प्लॅनमध्ये काय आहे?

किंमतीतील बदलानंतर, आता जिओच्या ६०१ प्लॅनमध्ये, तुम्हाला दररोज १०० संदेश आणि २८ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळत आहे. यासोबतच दररोज ३ जीबी डेटाही वापरता येणार आहे. खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला Disney + Hotstar चे १ वर्षाचे सबस्क्रिप्शन मिळेल. तसेच, जिओच्या इतर अॅप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.