कार निर्मिती कंपनी kia india चे इन्स्टाग्राम खाते हॅक झाले आहे. कंपनीने खाते हॅक झाल्याची पुष्टी देखील केली आहे. अज्ञात हॅकरने हे काम केले. हॅकरने खात्यावर एक व्हिडिओ मेसेज पोस्ट केला आहे ज्यामध्ये ‘Remember us? #ly #tomy Party time ?’. असे लिहिले आहे.

‘car&bike’ने आपल्या अहवालात सांगितले की, कंपनीचे खाते हॅक करण्यात आले असून कंपनी त्यास रिस्टोअर करण्याचे प्रयत्न करत आहे. हॅक होण्याचा हा पहिला प्रकार नाही. कंपनीचे सोशल मीडिया खाते या पूर्वीदेखील हॅक झाले होते.

देशात १९ मे २०१७ मध्ये किआ इंडियाची सुरुवात झाली होती. सध्या बाजारात किआची अनेक वाहने उपलब्ध आहेत. कंपनी सध्या किआ सॉनेट, किआ सेल्टॉस, किआ कारेन्स, किआ कार्निवल आणि किआ ईव्ही ६ इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर सारखी वाहने विकत आहे.

(३० वर्षांपूर्वी पाठवण्यात आला होता पहिला SMS, काय लिहिले होते? जाणून घ्या)

देशात हॅकिंगच्या घटना, ‘AIIMS’वर सायबर हल्ला

‘AIIMS’चा सर्व्हर हॅकर्सने हॅक केल्याची माहिती ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली होती. हॅकर्सने AIIMS प्रशासनाकडे जवळपास २०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समजले. इतकेच नव्हे तर ही खंडणीची रक्कम क्रिप्टोकरन्सीच्या (आभासी चलन) स्वरुपात द्यावी, अशीही मागणी हॅकर्सनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनी कन्ट्रोलच्या माहितीनुसार, ‘AIIMS’चा सर्व्हर हॅक झाल्याने ३ ते ४ कोटी रुग्णांचा तपशील धोक्यात आला आहे. सध्या रुग्णालयातील आपत्कालीन रुग्ण, ओपीडी, प्रयोगशाळा आणि इतर कामकाज कॉम्प्युटरशिवाय केले जात आहे. एम्स रुग्णालयाचा सर्व्हर हॅक करण्यासाठी रॅनसमव्हेअर या सॉफ्टवेअरचा वापर केला जात होता.