Lava ही देशातील मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेमध्ये सादर करत असते. त्यामध्ये अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट देण्यात आलेले असतात. लवकरच Lava ने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने आपला Lava Agni 2 5G लॉन्च केला आहे. या फोनचे फीचर्स काय आहेत आणि त्याची किंमत काय आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Lava Agni 2 5G चे फीचर्स

Lava च्या या फोनमध्ये तुम्हाला ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफरेश रेट हा १२० Hz इतका आहे. या फोनचा डिस्प्ले AMOLED असणार आहे. याबाबतचा एक टीझर जारी केला आहे. त्यामध्ये याचा डिस्प्ले हा कर्व्ह आहे. Lava च्या या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इतके स्टोरेज तुम्हाला मिळणार आहे. याशिवाय यामध्ये तुम्हाला ५००० mAh ची बॅटरी आणि ४४ w चे वायरचे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. तसेच फोनमध्ये टाइप-सी चा सपोर्ट मिळेल. याशिवाय या लावा फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर मिळणार आहे.

हेही वाचा : टेलिकॉम क्षेत्रात उडाली खळबळ! ‘ही’ कंपनी आपल्या ११ हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

हेही वाचा : Motorola चा ‘हा’ तगडा स्मार्टफोन २३ मे ला भारतात होणार लॉन्च, ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि…

Lava Agni 2 5G या फोनमध्ये चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रायमरी लेन्स ही ५० मेगापिक्सलची आहे. तसेच सेल्फी आणि व्हीडिओसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा या फोनमध्ये वापरकर्त्यांना मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय असणार किंमत ?

Lava Agni 2 5G हा स्मार्टफोन २४ मे पासून Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. याची किंमत कंपनीने २१,९९९ रुपये ठेवली आहे. परंतु ग्राहकांना सर्व प्रमुख डेबिट आणि क्रेडिट कार्डवर २,००० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. डिस्काउंटमुळे त्याची किंमत १९,९९९ रुपये होईल.