देशांतर्गत लावा कंपनीने सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात आपला नवीन स्मार्टफोन ‘Lava Yuva Pro’ भारतात लाँच केला आहे. या मोबाईल फोनमध्ये ३ जीबी रॅमसह ३२ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. जाणून घेऊया फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल…
Lava Yuva Pro स्पेसिफिकेशन्स
Lava Yuva Pro २०:९ अॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो ७२० x १६०० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.५१७ इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या लेटेस्ट फोनमध्ये अँड्रॉयड १२ ओएस सपोर्ट मिळेल. या फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी ६०हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. हा फोन २६९ पीपीआय तथा १६.७एम कलरला सपोर्ट करतो तथा कंपनीनं फोन डिस्प्लेला २.५ डी कर्व्ड गोरिल्ला ग्लासची सुरक्षा दिली आहे.
आणखी वाचा : नोकिया T10 LTE आवृत्ती भारतात लॉन्च; किंमत फक्त…
या फोनमध्ये बॅक पॅनेलवर तीन रियर कॅमेरे दिले आहे. १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर सोबत २ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे. Lava Yuva Pro एक ड्युअल सिम फोन आहे जो ४जी एलटीई वर चालतो. ३.५ एमएम जॅक सोबतच फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाईल फोन १०वॉट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या ५,०००एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक ग्रे आणि मेटॅलिक ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
किंमत
Lava Yuva Pro या स्मार्टफोनची किंमत ७,७९९ रुपये ठेवण्यात आली असून ग्राहकांना या हँडसेटला कंपनीच्या अधिकृत साइटवरून खरेदी करता येईल.