Facebook, इंस्टाग्रामची मूळ कंपनी असणाऱ्या Meta ने AI चे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. या लेटेस्ट मॉडेलच्या मदतीने वस्तू ओळखणे सोपे होणार आहे. याशिवाय मेटाने Image annotation डेटासेट लॉन्च केला आहे. याच्या मदतीने वापरकर्ते फोटो आणि व्हिडिओमध्ये उपस्थित ऑब्जेक्ट सहजपणे ओळखण्यास सक्षम असतील आणि ते पुढे त्याचा वापर करू शकतील.

मेटाने आपल्या लेटेस्ट ब्लॉगपोस्टमध्ये सांगितले की, मेटाच्या रिसर्च विभागाने एक अ‍ॅडव्हान्स ऑब्जेक्ट ओळखण्याचे मॉडेल तयार केले आहे. त्याचे नाव सेगमेंट एनीथिंग मॉडेल (SAM ) असे आहे. SAM चे डिझाईन SAM फोटो आणि व्हिडिओमधील ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी डिझाइन केले आहे. हे मॉडेल सध्या ट्रेनिंग फेसमध्ये आहे.

Anant Ambani and Radhika Marchant pri Wedding
Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क
Maha Metro, Nagpur, decrease, Metro fare, 33 percent, March 1 2024,
नागपूरकरांसाठी गुड न्यूज, मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त
dharavi redevelopment project pvt ltd marathi news, dharavi business owners marathi news
धारावी पुनर्विकासात व्यावसायिकांना आता जीएसटी सवलतीचे गाजर…पण पुनर्विकास कोठे होणार याबाबत मौन!
mumbai mcdonald marathi news, all food and license holder foundation marathi news
मुंबई : मॅकडोनाल्डविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

हेही वाचा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी AI बाबत व्यक्त केली चिंता; म्हणाले, “सोशल मीडियाचा…”

Sam मॉडेल आणि डाटासेट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. SAM मॉडेल आणि डेटासेट हे गैर-व्यावसायिक परवान्याअंतर्गत समाविष्ट आहेत. तथापि जर कोणी आपला फोटो अपलोड केला तर कंपनी तो फोटो संशोधनासाठी वापरू शकते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. भविष्यामध्ये SAM मॉडेलचा उपयोग अनेक अ‍ॅप्लिकेशनमध्ये केला जाऊ शकतो. ज्यामुळे फोटोमधील ऑब्जेक्टची माहिती शोधण्यात मदत होईल. AI सिस्टीम तयार करण्यासाठी SAM मॉडेल मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरू शकते.

टेक्नोलॉजी क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांचे असे म्हणणे आहे की, SAM मॉडेल कंटेंट निर्माण करणाऱ्यांसाठी एकापेक्षा जास्त मॉडेल्समध्ये वापरले जाऊ शकते. यासोबतच वापरकर्ते व्हिडिओ आणि फोटोमध्ये इमेज वेगळे करू शकतील.तसेच हे मॉडेल वैज्ञानिक संशोधनात वापरले जाऊ शकते. शास्त्रज्ञ फोटो आणि व्हिडिओ फुटेजमध्ये उपस्थित असलेल्या ऑब्जेक्ट वरून प्राण्याला ट्रॅक करण्यास सक्षम असतील.