मायक्रोसॉफ्ट कंपनीचे ‘वर्डपॅड’ (WordPad) हे खूप जुनं ॲप्लिकेशन आहे. तसेच या ॲप्लिकेशनचा अनेक गोष्टींसाठी उपयोग होतो. तुम्ही संभाषणातील महत्त्वाचे मुद्दे इंग्रजी, मराठी भाषेतील स्क्रिप्ट लिहून, एडिट करून ती सेव्हसुद्धा करू शकता. यामध्ये असणाऱ्या अनेक फीचर्सचा उपयोग करून टेक्स्ट अलाइनमेंट, फॉन्ट, फॉन्ट इफेक्ट व रंगाचा वापर करून अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने फॉरमॅटिंग पूर्ण करता येते. पण, आता या ॲप्लिकेशनला निरोप देण्याची वेळ आली आहे.

१९९५ पासून चालत आलेल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममधील मुख्य ॲप्लिकेशन ‘वर्डपॅड’ काढून टाकण्यात येणार आहे. मायक्रोसॉफ्टने विंडोजच्या काही इतर फीचर्ससह वर्डपॅड हा ॲप काढून टाकण्याची घोषणा केली आहे. विंडोज ११ (Windows 11), २४एच२ (24H2) आणि विंडोज सर्व्हर २०२५ (Windows Server 2025) मध्ये लाँच होणाऱ्या विंडोजच्या सर्व आवृत्त्यांमधून वर्डपॅड काढून टाकले जाईल, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा…व्हॉट्सअ‍ॅप करणार इतर पेमेंट ॲप्सशी स्पर्धा; युजर्ससाठी सुरू करणार ‘ही’ नवी UPI सेवा…

वर्डपॅड बरोबर wordpad.exe, wordpadfilter.dll आणि write.exe सह ऑपरेटिंग सिस्टम (OS) मधून काढून टाकल्या जातील. वापरकर्त्यांकडे वर्डपॅडचा वापर करण्यासाठी फक्त काही महिने शिल्लक आहेत. कारण मायक्रोसॉफ्टची 24H ची नवीन आवृत्ती लवकरच लाँच केली जाईल. तसेच तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, मायक्रोसॉफ्टच्या नवीन आवृत्तीमध्ये नोटपॅडचे अपडेटेड व्हर्जन, गूगल डॉक्स आणि ऑफिस ३६५ Suite यासारखे इतर पर्याय असणार आहेत.

मायक्रोसॉफ्टच्या नवीन आवृत्ती विंडोजच्या सुरक्षा फीचर्समध्ये सुधारणा करतील. त्यामुळे नवीन बदलांशी जुळवून घेण्यासाठी वापरकर्त्यांना थोडा वेळ लागू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या पुढील विंडोजमध्ये बिल्ट-इन, डीफॉल्ट आरटीएफ रीडर हे ॲप्स उपलब्ध नसणार आहे. अधिकृत अहवालानुसार, डॉक (doc) आणि आरटीएफ (rtf) आणि नोटपॅड, मायक्रोसॉफ्ट वर्ड (Microsoft Word) आदी ॲप्सचा वापरकर्त्यांनी एखादे मजकूर लिहिण्यासाठी उपयोग करावा, असे मायक्रोसॉफ्टने सुचवले आहे. याव्यतिरिक्त VBScript म्हणूनदेखील आणखीन एक फीचर युजर्ससाठी उपलब्ध असेल. तर आता लवकरच मायक्रोसॉफ्टची नवीन आवृत्ती लाँच होईल आणि तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर तुम्हाला वर्डपॅड ॲप्लिकेशन वापरता येणार नाही.