सध्या chatgpt हे माध्यम खूप चर्चेत आहे. हा चॅटबॉट ओपनएआय कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लॉन्च केला आहे. त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी गुगलने देखील आपला Bard AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. तसेच मायक्रोसॉफ्ट कंपनीने मंगळवारी भारतामध्ये आपला ‘जुगलबंदी’ या AI चॅटबॉटचे लॉन्चिंग केले आहे. याचा उपयोग अणि याचा वापर कसा करायचा याबद्दल जाणून घेऊयात.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, हा AI चॅटबॉट भारतात ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत सरकारी योजना सहजपणे पोहोचवण्यासाठी मदत करणार आहे. या चॅटबॉटला मायक्रोसॉफ्ट रिसर्च आणि सरकार समर्थित AI4Bharat च्या मदतीने विकसित करण्यात येत आहे. जे आयआयटी मद्रास आणि OpenNyAI वर आधारित एक ओपन सोर्स भाषेचे AI केंद्र आहे.

knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?
pistols Nagpur city
नागपूर शहरात पुन्हा वाढला पिस्तुलांचा वापर
Narendra Modi amit shah
केंद्र सरकार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात CAA लागू करणार; सूत्रांची माहिती, पोर्टलही तयार
HF Deluxe Bike
देशातच नव्हे तर विदेशातील ग्राहकांना हिरोच्या ‘या’ बाईकचं लागलं वेड; झाली धडाक्यात विक्री, १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ८३ किमी

हेही वाचा : समस्या सांगा अन् झटक्यात उत्तर मिळवा, शेतकऱ्यांसाठी आता लॉन्च झाला KissanGpt; जाणून घ्या

मायक्रोसॉफ्टने मंगळवारी प्रकाशित केलेल्या त्यांच्या ब्लॉगमध्ये बॉटच्या मागे असणारे व्हिजनबद्दल सांगितले आहे. ज्यामध्ये सांगण्यात आले भारतातील व्यावसायिक आणि सार्वजनिक जीवन मोठ्या प्रमाणात इंग्रजीमध्ये चालत असले तरी लोकसंख्येच्या केवल ११ टक्के लोकं या भाषेचा वापर करतात. तर ५७ टक्के लोकं ही हिंदी भाषेचा वापर करतात.कंपनीने सांगितले, ”भाषेच्या अडचणींमुळें अनेक लोकांपर्यंत सरकारी योजना पोचत नाहीत. जुगलबंदी सर्व भारतीयांना एका मोबाईलच्या माध्यमातून स्थानिक भाषेतील माहिती सहज उपलब्ध करून देणार आहे.”

जुलगबंदी कसे काम करते ?

एखाद्याला WhatsApp नंबरवर टेक्स्ट किंवा ऑडिओ मेसेज पाठवावा लागतो ज्यामुळे चॅटबॉट सुरु होतो असे Microsoft ने स्पष्ट केले. AI4Bharat स्पीच रेकग्निशन मॉडेल वापरून मेसेजला टेक्स्टमध्ये ट्रांसक्रिप्ट केले जाते. त्यानंतर AI4Bharat द्वारे प्रशिक्षित करण्यात आलेल्या भाषेच्या भाषांतर मॉडेलद्वारे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केले जाते.