टिफीनमधील अन्न दीर्घकाळ गरम राहात नाही. परिणामी घरी पॅक केलेले गरम अन्न ऑफिसमध्ये थंडे होऊन जाते. अन्नाची चव चांगली जरी असली, तरी थंड झाल्यावर खाण्याची इच्छा उरत नाही. मात्र, तुमची ही समस्या मिल्टनचा स्मार्ट टिफीन दूर करू शकतो. मिल्टनने Milton Smart Electric App Enabled Tiffin उपलब्ध केला आहे. या टिफीनमध्ये अन्न गरम करता येते. विशेष म्हणजे व्हॉइस कमांडद्वारे तुम्ही या टिफीनमध्ये अन्न गरम करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहेत फीचर्स?

मिल्टनचा हा स्मार्ट इलेक्ट्रिक टिफीन वायफायने कनेक्ट होतो आणि स्मार्टफोनवर अ‍ॅपने कनेक्ट होतो. टिफीनमध्ये ३०० एमएलचे तीन डबे मिळतात आणि तो अलेक्सा आणि गुगल व्हॉइस असिस्टंटसोबत काम करतो. याने कमांड देऊन अन्न गरम करता येऊ शकते.

(Xiaomi धमाकेदार ऑफर ! 50 मेगापिक्सेलचे तीन कॅमेरे असलेल्या ‘या’ 5G फोनवर २५ हजार रुपयांची बंपर सूट!)

मिल्टन स्मार्ट इलेक्ट्रिक टिफीन अ‍ॅपवर काम करतो. स्मार्टफोनमधील अ‍ॅपच्या माध्यमातून टिफीनमध्ये अन्न गरम करण्याची सुविधा मिळते. यासाठी तुम्हाला हा टिफीन वायफाय नेटवर्कशी कनेक्ट करावा लागेल. अन्न गरम होण्यासाठी ३० मिनिटे लागतात. महत्वाचे म्हणजे, अन्न गरम झाल्यानंतर टिफीन आपोआप बंद होतो. मिल्टनचा स्मार्ट टिफीन प्रेशर वॅक्युम झाकन असलेल्या डब्यांसह मिळतो. टिफीन २२० ते २४० वोल्ट विद्युतचा उपयोग करतो.

इतकी आहे किंमत?

अमेझॉनवर या स्मार्ट टिफीनची लिस्टेड किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. मात्र, या टिफीनवर ३३ टक्क्यांची सूट मिळत आहे. त्यामुळे, या स्मार्ट टिफीनची किंमत २ हजार रुपये झाली आहे. तुम्हाला ऑफिसमध्ये थंडे अन्न खाण्याची इच्छा नसेल तर तुम्ही हा टिफीन खरेदी करू शकता आणि गरम अन्न पदार्थांचे सेवन करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milton smart electric tiffin features and price ssb
First published on: 02-11-2022 at 11:57 IST