मोटोरोलाने आपल्या ई-सिरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन्सची घोषणा केली आहे. Moto E22 आणि Moto E22i स्मार्टफोन हे कंपनीचे नवीन स्मार्टफोन आहेत. मोटोरोलाचे हे दोन्ही फोन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहेत आणि त्यात ५००० mAh बॅटरी आहे. Moto E22 आणि Moto E22i मध्ये MediaTek Helio G37 प्रोसेसर आणि १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. आम्‍ही तुम्‍हाला मोटोरोलाच्‍या दोन्ही नवीन हँडसेटच्‍या किंमती, फीचर्सविषयी आणि किमतीबद्दल सांगणार आहोत.

Moto e22 and Moto e22i Price in india
Moto E22 च्या ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत € १३९.९९ (सुमारे ११,२०० रुपये) आहे. Moto E22i ची किंमत युरोपियन बाजारात १२९.९९ (अंदाजे रु १०,३००) आहे. कंपनीने Moto E22 क्रिस्टल ब्लू आणि अॅस्ट्रो ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. Moto E22i विंटर व्हाइट आणि ग्रेफाइट ग्रे रंगांमध्ये येतो.

मोटोरोलाचे दोन्ही फोन लवकरच युरोप, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि आशियाई बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जातील.

आणखी वाचा : Airtel ग्राहकांसाठी मोठी बातमी! केवळ १,७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वर्षभर अनलिमिटेड कॉल आणि डेटा

Moto e22 and Moto e22i Specifications
Motorola चे नवीन E-Series स्मार्टफोन ६.५ इंचाच्या HD+ डिस्प्ले पॅनेलसह येतात. स्क्रीनचा रिफ्रेश रेट ९० Hz आहे आणि आस्पेक्ट रेशो २०:९ आहे. डिस्प्लेवर वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये कंपनीने Octa-core MediaTek Helio G37 प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्ससाठी IMG PowerVR GE8320 GPU उपलब्ध आहे.

Moto E22 आणि Moto E22i स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सेल प्रायमरी आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये ५ मेगापिक्सेल फ्रंट सेन्सर आहे. Moto E22 आणि Moto E22i ला चार्ज करण्यासाठी ४०२० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी १० W चार्जिंगला सपोर्ट करते.

आणखी वाचा : iPhone 14 Pro Feature: तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये आयफोन 14 चे हे ५ फीचर्स आधीपासूनच आहेत

या Motorola स्मार्टफोन्समध्ये MicroSD कार्ड स्लॉट स्वतंत्रपणे उपलब्ध आहे. या फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये टाइप-सी पोर्ट, ड्युअल सिम सपोर्ट, 4जी, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5 आणि जीपीएस सारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध आहेत. या मोटोरोला फोनचे वजन १७२ ग्रॅम आहे आणि त्याची परिमाणे १६३.९५x ७४.६ x ७.९९ मिलीमीटर आहेत.

Moto E22 आणि Moto E22i मध्ये वॉटर रिपेलंट डिझाइन उपलब्ध आहे. हे दोन्ही हँडसेट स्टीरिओ स्पीकर सेटअपसह येतात जे डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करतात. Moto E22 स्मार्टफोन Android 12 आधारित MyUX सह येतो. तर E22i मध्ये Android 12 Go एडिशन देण्यात आले आहे.