मोटोरोलाने मंगळवारी आपल्या 5G स्मार्टफोन Moto G71 5G वर ४ हजार रुपयांची सूट जाहीर केली. ४ हजार रुपयांच्या सवलतीनंतर Moto G71 5G स्मार्टफोन केवळ १५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. १४,९९९ रूपयांच्या किमतीत Moto G5G निश्चितपणे एक उत्तम पर्याय आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही ऑफर स्टॉक उपलब्ध होईपर्यंत मर्यादित कालावधीसाठी आहे आणि केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. Moto G71 5G स्मार्टफोन या वर्षी जानेवारीमध्ये भारतात लॉंच झाला होता. हा फोन फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Moto G71 5G Price
Moto G71 5G चे ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट कंपनीने १८,९९९ रुपयांना लॉंच केले होते. पण कंपनीने फोनवर ३ हजार रुपयांची सूट दिली आहे. आणि जर तुमच्याकडे SBI कार्ड असेल तर तुम्हाला १ हजार रुपयांची आणखी सूट मिळू शकते. अशा प्रकारे हा फोन तुम्हाला १४,९९९ रुपयांना मिळेल. याशिवाय १,१९५ रुपयांच्या किमतीत डेबिट कार्ड EMI सह फोन मिळवण्याची संधी आहे. हँडसेटवर १२,५०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे. निळ्या आणि हिरव्या रंगात फोन मिळतोय.

आणखी वाचा : १३ हजाराची बचत करण्याची संधी, OnePlus Nord CE 2 Lite 5G आणि Redmi 9A Sport स्वस्तात खरेदी करा

Moto G71 5G specifications
Moto G71 5G स्मार्टफोन २०:९ च्या आस्पेक्ट रेशोसह ६.४ इंचाचा फुलएचडी+ (१,०८०×२,४०० पिक्सेल) मॅक्स व्हिजन एमोलेड डिस्प्ले दाखवतो. स्क्रीनचा रिफ्रेश रेट ६० Hz आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर आणि ६ GB रॅम आहे. Motorola Moto G71 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. हँडसेट Android 11 आधारित My UX सह येतो. Moto G71 5G मध्ये १२८ इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध आहे.

आणखी वाचा : Nokia ने भारतात लॉंच केला स्वस्त Nokia C21 Plus, बॅटरी ३ दिवस चालेल

Moto G71 5G मध्ये अपर्चर F/१.८ सह ५० मेगापिक्सेल प्रायमरी, अपर्चर F/२.२ सह ८ मेगापिक्सेल सेकंडरी आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओंसाठी Moto G71 5G मध्ये f/२.२ अपर्चरसह १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. मोटोच्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 802.11 AC, Bluetooth 5.0, GPS/A-GPS, NFC, USB Type-C आणि ३.५ mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये एक्सेलेरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहेत. फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

Motorola ने आपल्या फोनला चार्ज करण्यासाठी ५००० mAh बॅटरी दिली आहे. फोनसोबत ३३ W टर्बोपॉवर चार्जर उपलब्ध आहे. Moto G71 5G IP52-रेटिंगसह येतो आणि Dolby Atmos Audio ला सपोर्ट करतो. हँडसेटची परिमाणे १६१.१९×७३.८७×८.४९ mm आणि वजन १७९ ग्रॅम आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorola smartphone moto g71 5g rs 4000 price cut indias best 5g smartphone at just rs 14999 rupees prp
First published on: 14-07-2022 at 18:01 IST