कधी कुठल्या डॉक्युमेंटची गरज लागेल हे सांगणे कठीणच आहे, पण त्यासाठी सर्व अधिकृत कागदपत्र रोज आपण सोबत घेऊन तर फिरू शकणार नाहीच. अशावेळी तुम्हाला हवं तेव्हा आणि लागेल ते डॉक्युमेंट तुमच्या Whatsapp नंबर वर मिळालं तर.. अर्धे प्रश्न सुटतील नाही का? भारत सरकारच्या एका नव्या उपक्रमासह हे आता अगदी शक्य आहे. सरकारतर्फे एक Whatsapp हेल्प डेस्क नंबर लाँच करण्यात आला आहे जो वापरून आपण आपल्या कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र तसेच तुमच्या डिजिलॉकर अकाउंट मधील महत्त्वाची कागदपत्रे काही क्षणात मिळवू शकता.

भारत सरकारचा सर्वात कामाचा Whatsapp नंबर

भारत सरकारतर्फे 9013151515 हा क्रमांक जारी करण्यात आला आहे. हा क्रमांक आपण आपल्या फोनमध्ये सेव्ह करून यावर Whatsapp द्वारे चॅट करू शकता. याच नंबर वरून आपल्याला कागदपत्रे उपलब्ध होतील.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!

Whatsapp वर कसे मिळवा कोविड प्रमाणपत्र?

  • आपण वर नमूद केलेला क्रमांक फोनमध्ये सेव्ह केल्यावर एक मॅसेज करा.
  • आपल्याला उपलब्ध सेवांची माहिती मिळेल.
  • यात आपल्याला हवी ती सेवा निवडून मॅसेज करा.
  • तुम्हाला तुमचा कोविड नोंदणीत वापरलेला मोबाईल क्रमांक विचारला जाईल, जर Whatsapp नंबर तोच असेल तर तसाही पर्याय दिला जाईल, योग्य पर्याय निवडा.
  • तुम्हाला यानंतर थेट तुमचे प्रमाणपत्र Whatsapp वर पाठवले जाईल.

Share Market Tips: शेअर मार्केटमध्ये नवीन आहात? गुंतवणूक करण्याआधी कंपनीचे असे करा परीक्षण

DigiLocker वरून महत्त्वाची कागदपत्रे थेट Whatsapp वर

  • आपण आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची सॉफ्टकॉपी डिजी लॉकर वर सेव्ह करून ठेवून या नंबर वरून हवी तेव्हा Whatsapp वर मिळवू शकता.
  • जर अगोदरच आपले DigiLocker अकाउंट असेल तर आपल्याला आधार कार्ड क्रमांक विचारून थेट आवश्यक कागदपत्रांची यादी दाखवली जाईल
  • कागदपत्रांच्या यादीतील हवं असलेलं डॉक्युमेंट निवडून तुम्ही त्याची ऑनलाईन प्रत मिळवू शकाल.

भारत सरकारच्या माहितीनुसार हा क्रमांक अधिकृत व सुरक्षित असल्याने यावरून कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. मात्र वापरकर्त्यांनी नंबर कॉपी करताना काळजी घ्यावी. तसेच कोणतीही शंका आल्यास आपण सायबर सेलची मदत घेऊ शकता.