भारतासह जगभरात ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन चित्रपट, सीरियल, डॉक्युमेंट्री, वेबसीरिज पाहणाऱ्यांचा कल वाढतोय. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मनी रिचार्ज प्लॅन महाग केल्याने यूजर्स काही ठराविक प्लॅटफॉर्म्सकडे वळताना दिसत आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नेटफ्लिक्स या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मने अनेक नवे प्लॅन बाजारात आणले आहेत.

नेटफ्लिक्सची सेवा काही दिवस, एक महिना आणि एक वर्षांसाठी उपलब्ध आहे. यात स्टँडर्ड आणि प्रीमियम अशा दोन स्वरुपाचे प्लॅन आहेत. या प्लॅनमध्ये फरक असला तरी त्यामध्ये असलेल्या काही ऑफर्स या थोड्या-फार फरकाने समान असतात. त्यामुळे या दोन्ही प्लॅनमधील फरक कसा समजून घ्यायचा? यातील कोणता प्लॅन आपल्यासाठी बेस्ट आहे हे शोधताना अडचण होऊ शकते. त्यामुळे स्टँडर्ड प्लॅन आणि प्रीमियम प्लॅनमध्ये नेमका फरक काय आहे आणि त्यासंबधित माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. नेटफिल्सच्या ४ प्लॅन्सची किंमत नेमकी किती आहे आणि यातून युजर्सना नेमक्या कोणत्या सुविधा मिळणार जाणून घेऊ..

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Brazilian woman brings dead man in wheelchair to bank to sign loan
पैशासाठी काहीपण! मृत काकांना व्हिलचेअरवर घेऊन बँकेत पोहचली महिला अन्….धक्कादायक घटनेचा Video Viral
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

नेटफ्लिक्सकडून स्ट्ँडर्ड आणि प्रीमियमसाठी ४ प्लॅन्स दिले जातात. यातील प्रीमियम प्लॅनमध्ये यूजर्सना नेटफ्लिक्सवरून सर्व सुविधांचा लाभ घेता येतो. तर स्टँडर्ड प्लॅनही त्याच बरोबरीचा असतो.

यात नेटफ्लिक्स स्टँडर्ड प्लॅनमध्ये फुल एचडी स्ट्रीमिंग 1080p पर्यंत एचडीआर सपोर्टची क्वालिटी मिळते. तसेच चार अकाउंट एकाचवेळी डिव्हाइसवर वापरु शकतात. तर प्रीमियम प्लॅनमध्ये अल्ट्रा एचडी 4 के स्ट्रीमिंगसह एचडीआर सपोर्टची क्लालिटी मिळते, सोबत एकाच वेळी सहा अकाउंट एकाचवेळी डिव्हाइसवर अ‍ॅक्सेस करु शकतात. याशिवाय स्टँडर्ड प्लॅन असलेल्या २ डिव्हाइसमध्ये डाऊनलोड केलेला व्हिडीओ ऑफलाईन पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे तर प्रीमियममध्ये सहा डिव्हाइसवर ही सुविधा देण्यात आली आहे. स्मार्टफोन, कॉम्प्युटर, टॅबलेट, टीव्हीवर या दोन्ही प्लॅन्सच्या सेवा जाहिरातीविना पाहता येतील. यात स्टँडर्ड प्लॅनसाठी महिन्याला १२७९.०३ रुपये तर प्रीमियम प्लॅनसाठी १६५०.६० रुपये मोजावे लागणार आहेत यातून तुम्हाला नेटफ्लिक्स स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅनमधील फरक लक्षात आला असेल.

एकाचवेळी किती यूजर्स नेटफ्लिक्स पाहू शकतात?

नेटफ्लिक्सवर एकाचवेळी ५ यूजर्सना कोणत्याही प्लॅनशिवाय प्रोफाईल बनवण्यास परवानगी दिली जाते. एकाचवेळी मोबाईल, कॉम्प्युटरवर साईन इन करता येते. पण तुम्ही स्टँडर्ड प्लॅन घेतला तर केवळ दोन प्रोफाईल्सवरूनंच एकवेळी स्ट्रीमिंग करता येते. याचा अर्थ तुम्ही आधीपासूनचं दोन प्रोफाईल्सवरून स्ट्रीमिंग करत असाल तर तिसऱ्या प्रोफाईलला स्ट्रीम करता येणार नाही.

तर प्रीमियम प्लॅनमध्ये एकाचवेळी चार प्रोफाईल्सवरून स्ट्रीम करण्याची सुविधा आहे. याचा अर्थ कोणत्याही वेळी ५ प्रोफाईल्समधील ४ प्रोफाईल्स एकावेळी व्हिडीओ स्ट्रीम करु शकतात. एकाचवेळी किती यूजर्स या प्लॅनचा वापर करू शकतात यावरून तुम्ही तुमचा प्लॅन निवडू शकता.

कोणत्या प्लॅन्समध्ये ऑफलाईन व्हिडीओ पाहण्याची सुविधा?

नेटफ्लिक्सवर एकाचवेळी १०० अ‍ॅटिव्ह डाऊनलोडिंगला परवानगी आहे. मात्र हे तुम्ही कोणता प्लॅन घेता यावर अवलंबून असते. स्टँडर्ड प्लॅनमधील यूजर्स एकाच वेळी २ गॅजेटवर डाऊनलोडिंग व्हिडीओ ऑफलाईन पाहू शकतात. तर प्रीमियम प्लॅनमधील यूजर्स एकाचवेळी ६ गॅजेटवर व्हिडीओ डाऊनलोड करत ऑफलाईन पाहू शकतात.

नेटफ्लिक्सवरून बहुतेक कन्टेंट डाऊनलोड करता येतो. पण काही कन्टेंट लाईन्सेंस प्राप्त असल्याने तो केवळ स्ट्रीम करता येतो. त्यामुळे तो डाऊनलोड करण्यासाठी नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन प्लॅनची गरज असते.

प्रीमियम आणि स्टँडर्ड प्लॅनची किंमत

नेटफ्लिक्सच्या प्रत्येक प्लॅनमध्ये यूजर्सला नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातील प्रीमियम प्लॅनसाठी महिन्याला १६५०.१४ रुपये आणि स्टँडर्ड प्लॅनसाठी १२७८.६७ रुपये मोजावे लागतील. स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅनशिवाय नेटफ्लिक्सकडून यूजर्सना बेसिक विथ अ‍ॅड्स आणि बेसिक प्लॅन या दोन प्लॅन्स उपलब्ध आहेत. जर तुम्हाला स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅन महाग वाटत असतील तुमच्यासाठी हे बेसिक प्लॅन्स बेस्ट आहेत.

यात नेटफ्लिक्सवर ५७७.०१ रुपयांना बेसिक विथ अ‍ॅड्स प्लॅनचा आनंद घेऊ शकतात. या प्लॅनच्या नावावरूनचं तुम्हाला समजलं असेल की, कोणताही व्हिडीओ स्ट्रीम करताना तुम्हाला जाहिराती दिसणार आहेत. या प्लॅनमध्ये एका वेळी केवळ एका डिव्हाइसवरूनचं 720P HD क्वालिटी व्हिडीओ पाहण्यास परवानगी आहे.

यानंतर बेसिक प्लॅन हा बेसिक विथ अ‍ॅड्स प्लॅनपेक्षा थोडा महाग आहे. बेसिक प्लॅनसाठी यूजर्सला ८२४.६६ रुपये भरावे लागणार आहेत. पण या प्लॅनमध्ये व्हिडीओ स्ट्रीम करताना यूजर्सला कोणत्याही जाहिराती दिसणार नाहीत. बेसिक प्लॅनमध्ये यूजर्सला १ डिव्हाइस आणि 720p HD स्ट्रीमिंग रिझॉल्यूशनची लिमिट आहे. यासह कोणत्याही जाहिरातींशिवाय नेटफ्लिक्स कॅटलॉगपर्यंत जाण्यास परवानगी आहे.

यातील कोणता प्लॅन तुम्हाला आवडला किंवा परवडेल हे तुम्ही ठरवा, पण तुमच्या घरात एकाचवेळी अनेक स्क्रीनवर नेटफ्लिक्स वापरत असतील आणि तुमच्याकडे 4K सेटअप असेल तर नेटफ्लिक्सचा प्रीमियम प्लॅन तुमच्यासाठी सर्वात बेस्ट आहे. याशिवाय तुम्ही केवळ तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉपवरचं नेटफ्लिक्स पाहत असला तर यातील स्टँडर्ड प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे.