सहसा, मोबाईलमध्ये कॉल करण्यासाठी सिम म्हणजेच मोबाईल नेटवर्क असणे आवश्यक असते, परंतु तुम्ही मोबाइल नेटवर्कशिवाय कोणालाही कॉल करू शकता. तुमचा यावर विश्वास बसत नसला तरीही हे खरे आहे. स्मार्टफोनमध्ये एक खास फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही मोबाइल नेटवर्कशिवाय कोणालाही कॉल करू शकता. आज आपण अशी एक ट्रिक जाणून घेणार आहोत, जिच्‍या मदतीने कॉलिंग अधिक सोपे होणार आहे.

ज्या फीचरच्या मदतीने तुम्ही मोबाईल नेटवर्कशिवाय कोणालाही कॉल करू शकता, त्याचे नाव आहे ‘वायफाय कॉलिंग’. हे फीचर बहुतांश स्मार्टफोन्समध्ये आहे. ते अ‍ॅक्टिव्ह केल्यानंतर, तुम्ही नेटवर्कशिवाय कोणत्याही मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीशी सहजपणे कॉल करू शकता आणि त्यांच्याशी बोलू शकता. तथापि, या फीचरसाठी आपण वायफाय क्षेत्रामध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे. वास्तविक, हे फीचर केवळ वायफाय नेटवर्क सपोर्टच्या मदतीने कार्य करते.

आता पाहता येणार Disappeared मेसेज; Whatsapp चे नवे फीचर ठरतेय चर्चेचा विषय

जर तुम्ही आयफोन वापरकर्ता असाल आणि तुम्हाला हे फीचर अ‍ॅक्टिव्हेट करायचे असेल तर तुम्हाला आधी सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला मोबाईल डेटा पर्याय निवडावा लागेल. आता तुमच्यासमोर अनेक पर्याय असतील. तळाशी वायफाय कॉलिंगचा पर्याय दिसेल. तुम्ही येथे WiFi Calling On This iPhone या पर्यायावर क्लिक करा. आता हे फिचर तुमच्या आयफोनमध्ये सुरु केले जाईल आणि तुम्ही नेटवर्क झोनमध्ये न येता कोणालाही सहज कॉल करू शकाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे फीचर अँड्रॉईड फोनमध्येही काम करते. यासाठी तुम्हाला आधी सेटिंगमध्ये जावे लागेल. आता वायफायचा पर्याय निवडावा लागेल. त्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर वायफाय कॉलिंगचा पर्याय दिसेल. तुम्हाला ते चालू करावे लागेल. आता तुम्ही या फीचरचा फायदा घेत, नेटवर्क नसतानाही कॉल करू शकाल.