ट्विटरवर व्यावसायिकांसाठी नवे फीचर रोल आउट झाले आहे. या फीचरचा वापर करून वैयक्तिक अकाउंट आणि बिजनेस अकाउंट यामध्ये वर्गीकरण करणे अधिक सोपे होणार आहे. या फीचरचा वापर करून एखाद्या बिजनेस अकाउंटला त्याच्याशी संबंधित व्यक्ती, ब्रँड किंवा इतर व्यवसाय यांना लिंक करता येणार आहे. ही लिंक करण्याची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर मुळ अकाउंटच्या व्हेरीफिकेशन टिकच्या बाजुला या लिंक करण्यात आलेल्या अकाउंट्सचा बॅज दिसेल.

कंपनीचे नाव चौकोनी बॅजमध्ये सोनेरी टिकच्या बाजुला असेल. तर इतर लिंक अकाउंट्सचे नाव ब्लू टिकच्या बाजुला चौकोनी बॅजमध्ये असेल. ब्लॉग पोस्टद्वारे ट्विटरने या नव्या फीचरबाबत माहिती दिली. या अकाउंटवर कंपनीच्या नावापुढे चौकोनी बॅज दिसेल. सध्या हे फीचर मर्यादित अकाउंट्ससाठी रोल आउट करण्यात आले आहे.

आणखी वाचा: WhatsApp वर आता मेसेजसाठीही होणार View Once सुविधा उपलब्ध; लगेच जाणून घ्या

मुळ अकाउंटशी किती इतर अकाउंट जोडले जाऊ शकतात याबाबत कोणतीही मर्यादा नाही. अकाउंट लिंक झाल्यानंतर इतर सर्व जोडलेल्या अकाउंट्सवर ब्लू चेक मार्क आणि कंपनीचा लहान बॅज येईल. या फीचरचा वापर करून नेटवर्क अधिकाधिक मोठे करण्यासाठी युजर्सना मदत मिळेल. या फीचरचा वापर करण्यासाठी किती शुल्क आकरण्यात येईल, याबाबत अजुनही माहिती देण्यात आली नाही. लवकरच याबाबत माहिती देण्यात येईल.