Reddit Layoff : सध्या जगभरामध्ये अनेक जागतिक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत ही कर्मचारी कपात करण्यात येत आहे. आता पर्यंत Meta, Twitter, Amazonसह अनेक कंपन्यांनी कपात केली आहे. आता Reddit या कंपनीने देखील कर्मचारी कपात केली आहे.

सोशल प्लॅटफॉर्म असणाऱ्या Reddit कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के म्हणजे ९० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे आता अमेरिकेतील कर्मचाऱ्यांची कपात करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये Reddit चा समावेश झाला आहे. मेटा प्लॅटफॉर्मसह अनेक टेक कंपन्या महामारीच्या काळामध्ये नोकरीवर घेतल्यावर आता नोकऱ्यांची कपात करत आहेत. कारण आर्थिक मंदीचा सामना करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. याबाबतचे वृत्त moneycontrol ने दिले आहे.

google steps to lay off more employees
गूगलकडून कर्मचारी कपातीचे पाऊल; भारतासह इतर देशांमध्ये काही व्यवसायांचे स्थलांतर करणार
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार

हेही वाचा : आधार कार्ड वापरून Google Pay अकाऊंट कसे अ‍ॅक्टिव्ह करावे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

२०११ मध्ये कॉन्डे नास्ट या मासिकामधून वेगळे करण्यात आले होते. सध्याच्या काळामध्ये Reddit ला वॉलस्ट्रीटबेट्स आणि त्याच्या प्लॅटफॉर्मवरील इतर ठिकाणी लोकप्रियतेत वाढ झाली. जे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी स्टॉकवर सट्टा लावण्याचे ठिकाण बनले आहे.

Reddit कंपनी (Image Credit – REUTERS)

कंपनीचे सीईओ स्टीव्ह हफमन यांनी कर्मचारी कपातीबद्दल कर्मचाऱ्यांना केलेल्या ईमेलचा दाखला देत The Wall Street Journal ने मंगळवारी Reddit च्या या निर्णयाची माहिती दिली. The Wall Street Journal च्या रिपोर्टनुसार, हफमन यांनी कर्मचाऱ्यांना केलेल्या ईमेलमध्ये म्हणाले, या निर्णयाअंतर्गत खुल्या पदांची संख्या ३०० वरून १०० पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..