सध्या भारतीय बाजारपेठेत सॅमसंगचे अनेक फ्लिप फोन उपलब्ध आहेत. अनोख्या डिजाईनमुळे हे फीचर सध्या चर्चेत आहे. मात्र, सॅमसंगला आता फ्लिप टेक्नॉलॉजीमध्ये जोरदार टक्कर देण्यासाठी ओप्पोने नवीन फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे. कंपनीचा फोल्डेबल फ्लिप फोन बुधवारी Oppo Find N2 Flip ला जागतिक बाजारपेठेत लंडनमधील एका इव्हेंट दरम्यान लॉन्च करण्यात आले हा फोन अनेक खास फीचर्ससह लॉन्च करण्यात आला आहे. जो या सेगमेंटमध्ये सॅमसंगच्या फ्लिप फोनला टक्कर देऊ शकतो. आज आपण OPPO Find N2 Flip आणि Samsung Galaxy Z Flip 4 फीचर्स , स्पेसिफिकेशन आणि किंमत यामधील तुलना जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

OPPO Find N2 Flip vs Galaxy Z Flip 4 चे फीचर्स

Oppo Find N2 Flip मध्ये कंपनीने ६.८ इंचाचा फोल्डिंग AMOLED स्क्रीन दिली असून याचा कव्हर डिस्प्ले हा ३. २६ इंचाचा आहे. या फोनची जाडी फक्त ७.४५ मिमी इतकी आहे त्यामुळे त्याचे डिझाईन आणि रचना खूपच आकर्षक आहे. ओप्पो कंपनीने आपल्या या फोल्डेबल फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला असून यामध्ये Sony IMX 890 सेन्सर येतो. कंपनीने हे Hasselblad सोबत डेव्हलप केले आहे. तसेच यामध्ये ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स आहे. वापरकर्त्यांना या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा हा ३१ मेगापिक्सलचा मिळणार आहे.

Samsung Galaxy Z Flip4 या फोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले वापरकर्त्यांना मिळणार आहे. या फोनमध्ये Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्युशन १०८०x २६४० पिक्सल आणि रिफ्रेश रेट हा 120Hz इतका आहे. यामधील दुसरा डिस्प्ले आहे तो १.९ इंचाचा Super AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्युशन २६०x ५१२ पिक्सल इतके आहे.

हेही वाचा : Samsung चं टेन्शन वाढलं, Oppo चा दमदार FLIP फोन बाजारात, तब्बल ४ लाख वेळा…

ऑपरेटिंग सिस्टीम

ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये Samsung Galaxy Z Flip4 स्मार्टफोन Android 13 वर आधारित असणाऱ्या One UI 5 वर काम करतो. Samsung Galaxy Z Flip4 मध्ये ऑक्टा कोर Qualcomm SM8475 स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 (4 nm) हा प्रोसेसर आहे.तर OPPO Find N2 Flip स्मार्टफोन Android 13 आधारित असणाऱ्या ColorOS 13 वर काम करतो. OPPO Find N2 Flip मध्ये ऑक्टा कोअर MediaTek Dimensity 9000+ (4 nm) हा प्रोसेसर आहे.

स्टोरेज

Oppo Find N2 Flip हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम , १२८ जीबी स्टोरेज तसेच १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज आणि १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज या व्हेरिएंटमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. Samsung Galaxy Z Flip4 हा स्मार्टफोन १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज तसेच ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे.

कॅमेरा

Samsung Galaxy Z Flip4 या स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. तसेच वापरकर्त्यांना यामध्ये १० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. OPPO Find N2 Flip या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा येतो. विशेष म्हणजे वापरकर्त्यांना यामध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.

हेही वाचा : Cheapest Cooler: उन्हाळ्याच्या तोंडावर कूलर खरेदीत बंपर ऑफर, अवघ्या ५०० रुपयांत मिळतायेत ‘हे’ जबरदस्त पोर्टेबल कूलर

Oppo Find N2 Flip या फोल्डेबल फोनमध्ये वापरकर्त्यांना ४३००mAh इतकी बॅटरी मिळणार आहे. तसेच यामध्ये ४४ वॅटचे फास्ट चार्जर मिळणार आहे. मुख्य म्हणजे हा फोन ५जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी असलेला फोन आहे. हा फोन ३० मिनिटांत ५० टक्के चार्ज होतो. Samsung Galaxy Z Flip4 या स्मार्टफोनमध्ये २५ वॅटचे फास्ट चार्जिंग येते. यामध्ये ३७०० mAh ची बॅटरी येते. हा फोन देखील ३० मिनिटांत ५० टक्के चार्ज होतो.

किंमत

Oppo Find N2 Flip हा फोल्डेबल फोन ओप्पोने लॉन्च केला आहे. ज्याची किंमत ही ८४९ पौंड इतकी आहे. त्यामध्ये ८जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटच्या मॉडेलची भारतातील किंमत सुमारे ८०,००० रुपये आहे. भारतात हा फोन तुम्ही ८०,००० रुपयांना खरेदी करू शकणार आहात. तर १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटच्या टॉप मॉडेलची किंमत ही ९०,००० रुपये असणार आहे. भारतामध्ये तुम्ही हा फोन खरेदी करू शकणार आहात.

Samsung Galaxy Z Flip4 च्या ८जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ७६,९८० रुपये आहे. Samsung Galaxy Z Flip4 हा स्मार्टफोन तुम्ही Bora Purple, Graphite, Pink Gold, Blue, Yellow, White, Navy, Khaki आणि red या रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहात. OPPO Find N2 Flip हा स्मार्टफोन Black, Gold और Violet या रंगांमध्ये तुम्ही खरेदी करू शकणार आहात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppo find n2 flip v samsung galaxy z flip 4 comparison features price and camera tmb 01
First published on: 16-02-2023 at 16:36 IST