स्मार्टफोन बाजारात अनेक कंपन्यांकडून नवनवीन फिचर्स असलेले स्मार्टफोन्स सादर केले जात आहेत. चीनी स्मार्टफोन निर्माता ओप्पोने आपले K सीरीजचे दोन स्मार्टफोन ओप्पो K10 5G आणि ओप्पो K10 Pro 5G लाँच केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये यूजर्सना ६४ एमपी कॅमेरा आणि ८० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कंपनीच्या या दोन्ही फोनमध्ये डायमंड व्हीसी लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. यासोबतच 120 एचझेड रिफ्रेश रेड डिस्प्ले, हायपरबूस्ट गॅप फ्रेम स्टॅबिलिटी टेक्नॉलॉजी, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ एसओसी आणि मीडियाटेक डायमेनसिटी ८०००-मॅक्स चिपसेट देण्यात आला आहे. दोन्हीमध्ये ५००० एमएएच बॅटरी पॅक आहे.
दोन्ही उपकरणांची किंमत
ओप्पो K10 5G ची चीनमध्ये ८ जीबी रॅम + १२८ जीबी व्हेरियंटची किंमत CNY १,९९९ (अंदाजे रु २३,४००) आहे, तर ८ जीबी रॅम + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY २,१९९ आहे (अंदाजे रु. २५,७००) १२ जीबी रॅम + २५६ जीबी व्हेरियंटची किंमत CNY २,४९९ (अंदाजे रु. २९,२०० )आहे. हा फोन काळ्या आणि निळ्या या दोन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. ओप्पो K10 Pro 5G ची सुरुवातीची किंमत ८जीबी रॅम + १२८ जीबी व्हेरिएंटसाठी CNY २,४९९ (सुमारे २९,२०० रुपये) आहे. ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY २,७९९ (अंदाजे रु ३२,८००) आणि १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत CNY ३,१९९ (अंदाजे रु ३७,५००) आहे.




Oppo K10 5G स्पेसिफिकेशन
हा फोन अँड्रॉईड १२ सह कलरओएस १२.१ स्क्रीनवर चालतो. यात १२० एचझेड व्हेरिएबल रिफ्रेश रेटसह ६.५९-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. मीडियाटेक डायमेनसिटी ८००० -मॅक्स एसओसीद्वारे समर्थित असलेला हा पहिला फोन आहे आणि १२ जीबी LPDDR5 सह जोडलेला आहे. यात हायपरबूस्ट फुल लिंक गेम फ्रेम स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञान आणि डायमंड व्हीसी लिक्विड कूलिंग सिस्टम आहे. यात ६४ एमपी + ८ एमपी + २एमपीचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तर सेल्फीसाठी १६ एमपी कॅमेरा आहे. याशिवाय ५००० एमएएच बॅटरीसह ६७ वॅट सुपर फ्लॅश चार्जर देण्यात आला आहे.
नेटफ्लिक्स आणखी स्वस्त होणार? कंपनीनं दिले संकेत
Oppo K10 Pro 5G स्पेसिफिकेशन
अँड्रॉईड १२ सह कलरओएस १२.१ स्क्रीनवर चालणारा, फोन १२० एचझेड रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ संरक्षणासह ६.६२ इंच फुल एचडी+ अमोलेड ई४ डिस्प्लेसह येतो. हे क्लालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ एसओसीद्वारे समर्थित आहे. जे १२ जीबी रॅम सह पेअर केले जाऊ शकते. यात हायपरबूस्ट फुल लिंक गेम फ्रेम स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञान आणि डायमंड व्हीसी लिक्विड कूलिंग सिस्टम देखील आहे. कॅमेरामध्ये ५० एमपी + ८ एमपी + २ एमपी सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी यात १६ एमपी कॅमेरा आहे. यात ८० वॅट सुपर फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच बॅटरी आहे.