चीनी कंपनी ओप्पोने यावर्षी भारत आणि चीनमध्ये काही ए-सीरीज अंतर्गत स्मार्टफोन सादर केले आहेत. आता कंपनी ‘OPPO A98’ हा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. परंतु हा स्मार्टफोन बाजारपेठेत सादर होण्याआधीच या स्मार्टफोनचे तपशील उघड झाले आहेत. या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सशी संबंधित अनेक महत्त्वाचे तपशील चीनी मायक्रोब्लॉगिंग साइट Weibo वर शेअर केले गेले आहेत. जाणून घ्या या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • OPPO A98 फीचर्स

Oppo A98 च्या समोर आलेल्या तपशीलानुसार, हा ओप्पो मोबाईल पंच-होल स्टाइल डिस्प्लेवर सादर केला जाईल, जो फुलएचडी रिझोल्यूशनला सपोर्ट करेल आणि १२०Hz रिफ्रेश रेटवर काम करेल. उघड झालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनची स्क्रीन वक्र किनार असेल. OPPO A98 बद्दल असे सांगण्यात आले आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो जो 5G नेटवर्कला सपोर्ट करेल.

आणखी वाचा : लवकरच बाजारपेठेत धुमाकूळ घालायला येतोय सॅमसंगचा ‘हा’ नवा स्मार्टफोन; दमदार बॅटरीसह मिळतील जबरदस्त फीचर्स…

  • कॅमेरा आणि बॅटरी

हा मोबाईल फोन १०८ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरसह लॉन्च केला जाईल. असे सांगितले जात आहे की Oppo A98 १२ जीबी पर्यंत रॅम मेमरी वर लॉन्च केला जाऊ शकतो, ज्यामध्ये २५६ जीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळेल. त्याचप्रमाणे, पॉवर बॅकअपसाठी, Oppo A98 स्मार्टफोनमध्ये ६७W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान दिसेल, ज्यामध्ये ५,००० mAh बॅटरी देखील दिली जाईल. विशेष म्हणजे, हा स्मार्टफोन अवघ्या काही मिनिटातच चार्ज होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppo smartphone features leaked pdb
First published on: 31-10-2022 at 14:28 IST