Poco कंपनी लवकरच आपला नवीन Poco X5pro स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. अलीकडेच, Poco प्रमुख हिमांशू टंडन यांनी Poco X5 मालिका जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान लाँच होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. आता कंपनी या महिन्याच्या अखेरीस या हँडसेटचे अनावरण करू शकते, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान फ्लिपकार्टवर हा Poco X4 हा स्मार्टफोन केवळ ७९९ रुपयांना मिळणार आहे. ही ऑफर पाहून खरेदीदार खूप उत्साहित झाले आहेत. तुम्ही नवीन लाँच होणारा नाही तर Poco X4 हा स्मार्टफोन जो या आधी लाँच झाला आहे तो तुम्ही फ्लिपकार्टवर ७९९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात.

हेही वाचा : Flipkart Sale 2023: मोठी सुट, २७ हजारांचे Airpods Pro फक्त १,१५० रुपयांत; जाणून घ्या फीचर्स

Poco X4 Pro 5G या स्मार्टफोनची किंमत २३,९९९ रुपये असून फ्लिपकार्टवर हा फोन १६,४९९ रुपयांना विकले जात आहे. कारण फ्लिपकार्टवर ३१ टक्के डिस्काउंट मिळत आहे. तसेच यावर आणखी एक खास ऑफर देखील मिळत आहे ज्यामुळे या फोनची किंमत आणखी कमी होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक्सचेंजमध्ये Poco X4 Pro 5G वर १५,७०० रुपयांची सूट मिळत आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून हा फोन खरेदी केल्यास हा ५जी फोन तुम्ही फक्त ७९९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात. यात तुम्हाला ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते.