Realme ही एक चिनी कंपनी असून ,ती भारतामध्ये लवकरच तिचा Realme १० ४ जी हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन लाँच करताना कंपनी एक इव्हेंट करणार आहे. Realme आपला हा नवीन स्मार्टफोन ९ जानेवारी रोजी भारतात लाँच करणार आहे. हा इव्हेंट ९ तारखेला दुपारी होणार असून, फेसबुक, युट्युब यासारखा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रक्षेपित केला जाणार आहे.

कंपनीने या स्मार्टफोन्सची काही फीचर्स सांगितली आहेत. Realme 10 चा ४जी प्रकार हा परफॉर्मन्स टर्मिनेटर असणार आहे. यामध्ये AMOLED डिस्प्ले असेल. जे MediaTek Helio G99 SoC द्वारे समर्थित असणार आहे. या डिव्हाइसला सुपरडार्ट चार्जिंग सपोर्ट असणार आहे. या डिव्हाइसचे वजन १७८ ग्रॅम आहे. तसेच त्याची रॅम ८ जीबीपर्यंत असणार आहे.

हेही वाचा : Redmi Note 12 सिरीज झाली भारतात लाँच; पावरफुल कॅमेरासहित ‘हे’ मिळणार तगडे फीचर्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या स्मार्टफोनला ड्युअल कॅमेरा आहे. यामध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॅालसाठी १६ मेगापिक्सलचा सेन्सर असण्याची शक्यता आहे. तसेच Realme 10 ला ५००० एमएच क्षमतेची बॅटरी आहे. ३३ वॅटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट येईल. याला चार्जर हा USB Type-C पद्धतीचा असेल. कंपनीचे म्हणण्यानुसार याचे अपडेट हे टप्प्याटप्प्याने जाहीर केले जातील.