रेडमी १० स्मार्टफोन भारतात लाँच झाला असून यात 6000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यासोबतच कंपनीने रेडमी १० स्मार्टफोनमध्ये ५० एमपी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. हा स्मार्टफोन सध्या बाजारात २० हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोनला टक्कर देऊ शकतो. चला जाणून घेऊया रेडमी १० स्मार्टफोनचे फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स…

शाओमीने आपल्या नवीन रेडमी १० स्मार्टफोनमध्ये ६.७१ इंचाचा एचडी + एलसीडी डिस्प्ले दिला आहे. पिक्सेल रिझोल्यूशन १५००*७२० आहे आणि स्क्रीनच्या संरक्षणासाठी गोरिला ग्लास लावण्यात आली आहे. यात कंपनीने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड ११ आधारित MIUI १३ वर चालतो. स्मार्टफोनमध्ये ५० एमपी प्रायमरी कॅमेरा आणि मागील बाजूस २ एमपी डेप्थ सेन्सर आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ५ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. यात पोर्ट्रेट मोड आणि नाईट मोड असे अनेक मोड आहेत. याशिवाय स्मार्टफोनच्या बॅक पॅनलमध्ये कॅमेरा मॉड्यूलमध्येच फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4G LTE, ड्युअल सिम, वाय-फाय, ब्लूटूथ, GPS आणि USB टाइप सी पोर्टसह येतो. कंपनीने स्मार्टफोन पॅसिफिक ब्लू, मिडनाईट ब्लॅक आणि कॅरिबियन ग्रीन या तीन रंगात लाँच केला आहे.

Royal Enfield Scram 411 VS Yezdi Scrambler: किंमत, मायलेज आणि डिझाइन पाहून तुम्हीच ठरवा कोणती गाडी घ्यायची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाओमीने रेडमी १० स्मार्टफोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत १२,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन Flipkart आणि Mi.com वेबसाइटवरून २४ मार्चपासून खरेदी केला जाऊ शकतो. तुम्ही एचडीएफसी बँक कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला १००० रुपयांची सूट मिळेल.