दुचाकी क्षेत्रातील अ‍ॅडवेंचर्स बाइक विभागातील रफ अँड टफ बाइक्सना प्राधान्य दिले जाते. या दुचाकी विशेषतः डोंगराळ आणि लांब पल्ला गाठण्यासाठी डिझाइन केल्या जातात. तुम्हालाही अ‍ॅडवेंचर्स बाइक विकत घ्यायची असेल, तर तुम्ही या विभागातील दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती आज येथे मिळेल. जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी योग्य पर्याय निवडू शकाल. या तुलनामध्ये आमच्याकडे Royal Enfield Scram 411 आणि Yazdi Scrambler आहेत.

Royal Enfield Scram 411: कंपनीने ही अ‍ॅडवेंचर्स बाइक १५ मार्च रोजी भारतात लाँच केली आहे. ही गाडी तीन प्रकारांसह आहे. स्क्रम 411 अ‍ॅडव्हेंचर बाइकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने यामध्ये सिंगल सिलेंडर ४११ सीसी इंजिन दिले आहे, हे इंजिन २४.३१ पीएसची कमाल पॉवर आणि ३२ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह ५ स्पीड गिअरबॉक्स जोडला आहे. ब्रेकिंग सिस्टममध्ये कंपनीने दोन्ही चाकांसाठी डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. यात कंपनीने ड्युअल चॅनल एबीएस सिस्टम बसवले आहे.रॉयल एनफिल्डचा माजलेजबद्दल दावा आहे की , ६७ किमीचा मायलेज देते आणि हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. रॉयल एनफिल्ड स्क्रम 411 ची सुरुवातीची किंमत २.०३ लाख रुपये (एक्स-शोरूम) असून टॉप व्हेरियंटवर २.०८ लाखांपर्यंत जाते.

Ministry of Railways has Released f frequently asked questions for RPF Constable Vacancy 2024 Must Read
RPF Recruitment 2024: ‘आरपीएफ’मध्ये कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठी महाभरती; अर्ज करताना खाते कसे उघडावे? पाहा डिटेल्स
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
Those who violate the rules of cleanliness will get fine receipt online
मुंबई : स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?

गाडीचं इंजिन पाऊस किंवा भेसळयुक्त इंधनामुळे खराब झालं तरी मारुती सुझुकी करणार दुरुस्त, वाचा काय आहे योजना

Yezdi Scrambler: यझदी स्क्रम्बलर बाइक ही एक रेट्रो-डिझाइन केलेली अ‍ॅडवेंचर्स बाईक आहे. या गाडीचे दोन प्रकार कंपनीने बाजारात लाँच केले आहेत. बाइकमध्ये ३३४ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. जे लिक्विड कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन २९.१ पीएस पॉवर आणि २८.२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तसेच ५- गिअरबॉक्सशी सोबत जोडले आहे. बाइकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे, ज्यामध्ये ड्युअल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देखील बसवण्यात आले आहे. बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, गाडी ४२ किमीचा मायलेज देते आणि ARAI ने प्रमाणित केले आहे. यझदी स्क्रम्बलरची किंमत रु. २.०४ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटवर रु. २.१० लाखांपर्यंत जाते.