रेडमीने गेमर्स आणि, मल्टिटास्कर आणि चित्रपट पाहण्याची आवड असणाऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून आपला नवा रेडमी पॅड भारतात लाँच केला आहे. या पॅडची सुरुवातीची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. गतिमान कामगिरीसाठी पॅडमध्ये ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

रेडमीने हा टॅबलेट ३ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध केला आहे. हा टॅबलेट आज mi.com, mi homes आणि flipkart वर खेरदीसाठी उपलब्ध होईल. पॅडचा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला टॉप एन्ड मॉडेल आज सकाळी १० वाजता केवळ mi.com वर उपलब्ध होणार आहे. कंपनी या पॅडद्वारे गेमर्स, मल्टिटास्कर, आणि इंटरनेटचा अधिक वापर करणाऱ्या लोकांना आकर्षित करू पाहत आहे.

(‘हे’ पासवर्ड ऑनलाइन खात्यांसाठी धोकादायक, यादीत तुमचे पासवर्ड तर नाही ना? वाचा..)

रेडमी पॅडचे फीचर

पॅडमध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, वेगाने कार्य होण्यासाठी मीडियाटेक हेलिओ जी ९९ एसवसी चिपसेट देण्यात आले आहे. तसेच ६ जीबी पर्यंतची रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. प्रोसेसर आणि रॅम ही गेमर्ससाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच दीर्घ काळ चालण्यासाठी पॅडमध्ये मोठी ८ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, १८ वॉटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आले आहे.

तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

बेस ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १२ हजार ९९९ आहे. तर ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडलची सुरुवातीची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे, तर टॉप एन्ड मॉडेलची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. रेडमी पॅडमध्ये १०.६१ इंचचा डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले फार मोठा आहे. या डिस्प्लेवर गेम खेळताना किंवा चित्रपट पाहताना वेगळीच मजा येईल.

(कर्ज, थकबाकीच्या गर्तेत अडकली व्हीआई कंपनी, उभारीसाठी सीईओची सरकारडे ‘ही’ मागणी)

या सुविधा मिळणार मोफत

पॅडमध्ये मीडियाटेक हेलिओ जी ९९ चिपसेट आहे, तसेच ६ जीबी १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. ही स्टोरेज तुम्ही १ टीबी पर्यंत वाढवू शकता. पॅड अँड्रॉइड १२ वर चालतो. कंपनी पॅडसोबत तीन वर्षांचा सुरक्षा अपडेट देत आहे, तसेच पुढील तीन वर्षात अँड्रॉइडचे दोन व्हर्जन आणि एमआययूआय अपडेट देखील मिळणार आहे. तसेच २ महिन्यांकरिता मोफत युट्यूब प्रिमियम सदस्यत्व देखील मिळणार आहे.

गेमर्स, व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पॅडमध्ये ८ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच यात फास्ट चार्जिंगची देखील सुविधा आहे. टॅबला फूल चार्ज केल्यानंतर त्यावर २१ तासांपेक्षा अधिक काळ व्हिडिओ पाहता येऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच १२ तासांपेक्षा अधिक काळ गेम खेळता येईल, असेही कंपनीचे म्हणणे आहे. तर गाणे ऐकण्याची आवड असणाऱ्यांसाठी तर हा टॅब खूप फायदेशीर आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ८ दिवसांपेक्षाही अधिक काळ गाणे ऐकता येईल, असा दावा कंपनीने केला आहे.