AI ChatGpt चॅटबॉट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते.

केंद्र सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI ) वर बंदी घालणार की नवीन कायदा करणार? यावर सरकारने संसदेत उत्तर दिले आहे. देशात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) च्या रेग्युलेशनसाठी सरकार कोणताही कायदा करण्याचा विचार करत नाही नसून ‘देशात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्याचाही सरकार विचार करत नसल्याचे’ उत्तर आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत या प्रकरणावर बोलताना दिले. विविध डिपार्टमेंट आणि एजन्सी AI शी संबंधित चिंता आणि धोके दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक देशांनी ChatGPt वर बंदी घातली आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी यावर बंदी घालण्याच्या विरोधात विधान केले आहे.

हेही वाचा : WhatsApp च्या डिझाईनमध्ये लवकरच होणार ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर

AI नक्की काय आहे ?

AI म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेली बौद्धिक क्षमता होय. आर्टिफिशियल इंटेलिजेंट सिस्टम आता अशी कामे करण्यास सक्षम आहे जी आतापर्यंत फक्त मानव करत आहे. OpenAI द्वारे ChatGPT चॅटबॉट नोंव्हेंबर २०२२ मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा एक कृत्रिम AI आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ChatGpt – 4

OpenAI कंपनीने AI GPT 4 हे टूल लॉन्च केले आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे की, GPT 4 कंपनीच्या मागील GPT 3 आणि GPT 3.5 पेक्षा चांगली कामगिरी करेल. कंपनी म्हणते की GPT 4 हे एक मोठे मल्टीमोडल मॉडेल आहे . kR व्यवसाय आणि शैक्षणिक बेंचमार्कवर मानवी पातळीवरील कार्यप्रदर्शन दर्शवते. ज्यांच्याकडे सध्या चॅटजीपीटी प्लसचे सब्स्क्रिप्शन असलेले वापरकर्तेच या नवीन टूलचा वापर करून शकतात.ChatGPT अजूनही मजकूराद्वारे वापरकर्त्याच्या प्रश्नांना किंवा प्रश्नांना प्रतिसाद देते. तर नवीन सिरीज AI व्हिडीओ कंटेंट आणि चित्रपटांद्वारे प्रतिसाद देण्यास सक्षम असणार आहे. हे ChatGPT 4 मानव करतो तशीच ९ कामे करू शकतो.