देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फाइव्ह जीसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. या सभेमध्ये आपल्या भाषणात रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जगभरातील गुंतवणुकदारांचं लक्ष लागलेल्या भाषणामध्ये ही घोषणा केली. रिलायन्सची सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता सुरू झाली. मुकेश अंबानी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला संबोधित करताना फाइव्ह जीमध्ये दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. तसेच जीओचं फाइव्ह जी नेटवर्क हे जगातील सर्वात मोठं फाइव्ह जी नेटवर्क असेल असंही यावेळेस मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे.

मुकेश अंबानींनी जिओ फाइव्ह जीची घषणा करताना, “मला या ठिकाणी एक घोषणा करायची आहे. जीओच्या वाटचालीमधील हा पुढील टप्पा असून डिजीटल कनेक्टेव्हीटी खास करुन फिक्स ब्रॉडबॅण्डच्या क्षेत्रातील हे महत्वाचं पाऊल आहे, ज्याचं नाव आहे जीओ फाइव्ह जी. फाइव्ह जीच्या माध्यमातून आपण १०० मिलियन घरांना जोडणार आहेत. यापूर्वी कधीही न अनुभवलेली कनेक्टीव्हीटी या माध्यमातून स्मार्ट होम सोल्यूशन्स उपलब्ध करुन देईल,” असा विश्वास व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जीओ फाइव्ह जीची सेवा दिवाळीपासून सुरु होईल. ही पहिल्या टप्प्यातील सेवा असेल. सुरुवातीला केवळ चार शहरांमध्ये ही सेवा सुरु केली जाईल. दिवाळीच्या कालावधीमध्ये या सेवेचा शुभारंभ होईल. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकात्यामध्ये ही सेवा पुरवली जाईल. डिसेंबर २०२३ पर्यंत फाइव्ह जीची सेवा अनेक छोटी शहरं, तालुके आणि गावांमध्येही पोहचेल असा विश्वास मुकेश अंबानींनी व्यक्त केला आहे.