Reliance Jio ही भारतातील एक प्रमुख आणि सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीने सर्वात पहिल्यांदा आपले ५ जी नेटवर्क देशामध्ये सुरू केले आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन रीचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. आता देखील कंपनीने आपले ५ नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. ते प्लॅन किती रुपयांचे आहेत व त्यामध्ये ग्राहकांना कोणकोणते फायदे मिळणार आहेत ते जाणून घेऊयात.

रिलायन्स जिओने गाण्यांची आवड असणाऱ्यांसाठी ‘Jio Saavan Pro’ सब्स्क्रिप्शनसह नवीन bundled प्रीपेड मोबाईल रिचार्ज प्लान लॉन्च केले आहेत. ग्राहकांची मोबाइल कनेक्टिव्हीटी आणि म्युझिक सब्स्क्रिप्शनची गरज हे प्लॅन पूर्ण करतील असे कंपनीचे म्हणणे आहे. याबाबतचे वृत्त economictimes ने दिले आहे.

UPSC third topper Donuru Ananya Reddy told Virat Kohli is her inspiration
VIDEO : UPSC परिक्षेत तिसरा क्रमांक पटकावणारी अनन्या मानते कोहलीला आदर्श; म्हणाली, “विराटचा अ‍ॅटिट्यूड…”
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा
Kia adds two new automatic variants
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Kia ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे आणले २ नवे व्हेरिएंट, किंमत…

हेही वाचा : आता मोबाइलवर मोफत पाहता येणार आशिया कप, विश्वचषक स्पर्धा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मने केली घोषणा

रिलायन्स जिओच्या पाच प्रीपेड रिचार्ज प्लॅनपैकी २६९ , ५२९ आणि ७३९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स आणि sms चे फायदे मिळतात. याची वैधता २८ दिवसांपासून ८४ दिवसांपर्यंत आहे. तर जिओच्या ५८९ आणि ७८९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनुक्रमे ५६ आणि ८४ दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स आणि SMS ची मिळते.

JioSaavn Pro सबस्क्रिप्शनची किंमत सामन्यतः ९९ रुपये इतकी प्रति महिना इतकी आहे. वापरकर्ते जाहिरातीशिवाय गाणी, अमर्यादित डाउनलोड आणि अमर्यादित जिओ ट्यून्सचा आनंद घेऊ शकतात आणि चांगल्या क्वालिटीची गाणी ऑफलाईन पद्धतीने ऐकू शकतात.वरील पाचपैकी कोणत्याही प्लॅनचे रिचार्ज केल्यावर वापरकर्ते जिओ सावन डाउनलोड किंवा साइन इन करू शकतात. तसेच जाहिराती शिवाय गाणी ऐकणे सुरू ठेवण्यासाठी आपली जिओ मोबाइल नंबरच्या मदतीने म्युझिक स्ट्रीमिंग सर्व्हिसमध्ये साइन इन करू शकतात.

ज्यांच्याकडे जीओचा प्लॅन आहे ते जिओ सावनवर स्विच करू शकतात. नवीन रिचार्ज प्लॅन माय जिओ App किंवा जिओच्या वेबसाइटवरून अ‍ॅक्टिव्ह करता येऊ शकतो.