Relaince Jio ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स घेऊन येत असते. देशामध्ये सध्या रिलायन्स जिओनंतर एअरटेल या दोनच कंपन्यांनी आपले ५जी नेटवर्क सुरू केले आहे. तर आतासुद्धा जिओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी कमी वैधतेचे जे प्रीपेड प्लॅन्स आहेत त्यातील एका प्लॅनसह ६१ रुपयांचा बोनस डेटा देखील ऑफर करत आहे.

रिलायन्स जिओच्या कमी वैधता असणाऱ्या प्लॅनमधील हा कोणता प्लॅन आहे ज्यामध्ये कंपनी ६१ रुपयांचा बोनस डेटा देखील ऑफर करत आहे.याबद्दल जाणून घेणार आहोत. संबंधित ऑफर ही कोणतीही नवीन योजना नसून, तुम्ही याआधी देखील ही ऑफर रिचार्ज केली असेल. सध्याच्या काळामध्ये मोबाइल डेटाची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कमी वैधता आणि भरपूर डेटा असलेल्या प्रीपेड प्लॅन्सची आवश्यकता पूर्ण करून रिलायन्स जिओ ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करते. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : मेट्रोच्या तिकिटासाठी आता रांगेत थांबण्याची गरज नाही; ‘या’ अ‍ॅपच्या मदतीने मोबाईलवरच करता येणार बुक

हा प्लॅन मध्यम किंवा दीर्घकालीन वैधतेचा प्लॅन शोधत असणाऱ्यांसाठी नाही. आपण जिओच्या ३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्बद्दल जाणून घेऊयात.

रिलायन्स जीओचा ३९९ रूपयांचा प्लॅन

रिलायन्स जीओचा ३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना फक्त २८ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये वापरकर्त्यांना दररोज ३ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. तसेच जिओने या प्लॅनसह ६१ रुपयांचा बोनस डेटा देत असल्याचे सांगितले. या प्लॅनसह रिचार्ज करणाऱ्या जिओच्या वापरकर्त्यांना ६ जीबी बोनस डेटा मिळणार आहे. याचा अर्थ फक्त २८ दिवसांसाठी एकूण ९० जीबी डेटा मिळणार आहे. ज्यांचा दररोजचा डेटाचा वापर मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो.

वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ Apps चे सबस्क्रिप्शन मिळते. लक्षात घ्या की या प्लॅनचे सदस्यत्व घेणारे वापरकर्ते Reliance Jio कडून अमर्यादित 5G डेटा ऑफरसाठी पात्र आहेत. भारतामध्ये जिओने सर्वात पहिले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. आता कंपनीने ६००० पेक्षा जास्त शहरांमध्ये ५ जी नेटवर्क सुरु कलेले आहे. २०२३ च्या अखेरीस संपूर्ण देशामध्ये ५जी नेटवर्क सुरू करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. जिओ २३९ रूपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड ५ डेटा ऑफर करते.