Reliance Jio recharge: जिओसह सर्व खासगी दूरसंचार कंपन्यांनी गेल्या जुलै महिन्यात आपल्या मोबाइल दरात २२ टक्क्यांनी वाढ केली होती. तेव्हापासून मोबाईल रिचार्ज प्लॅन खूपच महाग झाले आहेत. जिओकडे सध्या १४ दिवसांपासून ते ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह रेग्युलर रिचार्ज प्लॅन आहे, ज्यामध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट डेटा, एसएमएस इत्यादींचा लाभ मिळतो. २८ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनपेक्षा ८४ दिवसांचे प्लॅन स्वस्त आहेत, ज्यामुळे बहुतेक युजर्स ३ महिन्यांच्या प्लॅनसह रिचार्ज करतात.

तुम्ही देखील जिओ युजर्स असाल आणि सर्वात स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर जिओचा हे दोन रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी फायजेशीर ठरू शकतात.जिओचे हे दोन्ही प्लॅन ८४ दिवस आणि ६५ दिवसांच्या वॅलिडीटीसह येतात. जिओच्या या दोन रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया.

जिओचा ४५८ रुपयांचा प्लान

जिओने त्यांच्या यूजर्ससाठी परवडणारा व्हॉइस-ओन्ली प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना ८४ दिवसांची वैधता मिळते. या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि संपूर्ण भारतात कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी मोफत राष्ट्रीय रोमिंगचा फायदा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना १ हजार फ्री एसएमएसचाही फायदा मिळतो. याव्यतिरिक्त कंपनी आपल्या यूजर्सना जिओ सिनेमा आणि जिओ टीव्ही सारख्या मोफत अॅप्सचा पर्याय देत आहे.

जिओचा १९५८ रुपयांचा प्लान

जिओचा या प्रीपेड प्लॅनची वॅलिडीटी ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये यूजर्सना भारतात कुठेही कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. एवढंच नव्हे तर यासोबत मोफत राष्ट्रीय रोमिंग आणि ३ हजार ६०० मोफत एसएमएस मिळतील. या प्लॅनमध्येही जिओ आपल्या यूजर्सना जिओ सिनेमा आणि जिओ टीव्ही या मोफत अॅप्सचा प्रवेश देते.

जिओ युजर्संना हा प्लॅनही ठर शकतो फायदेशीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हिरो 5G’ प्लॅन असे नाव दिले आहे. सर्वात कमी किमतीचा अनलिमिटेड 5G प्लॅन असलेल्या ३४९ रुपयांच्या प्लॅनसोबतही हे नाव शेअर करण्यात आले आहे. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये पूर्वीप्रमाणेच रोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळते. म्हणजेच तुम्हाला हवं तेवढं बोलून रोज १०० SMS पाठवू शकता. यामध्ये एअरटेलचा ९७९ रुपयांचा प्लॅनही जिओच्या मागे नाही, ज्यामध्ये युजर्सलाही त्याच सुविधा मिळतात.