scorecardresearch

फोन चोरी झाल्यास ॲप्पल आणि सॅमसंग युजर्सना कळणार लोकेशन; जाणून घ्या काय आहे नवे फीचर

फोन चोरी झाल्यानंतर सॅमसंग आणि ॲप्पल युजर्सना एका नव्या फीचरद्वारे त्याचे लोकेशन शोधता येणार आहे.

फोन चोरी झाल्यास ॲप्पल आणि सॅमसंग युजर्सना कळणार लोकेशन; जाणून घ्या काय आहे नवे फीचर
प्रातिनिधिक फोटो

आजकाल फोन अतिशय महत्वाची गोष्ट झाली आहे. कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी आपण सतत मोबाईल वापरतो. इतरांच्या संपर्कात राहणे मोबाईलमुळे सोप्पे झाले आहे. पण कधीजर आपला फोन चोरी झाला तर मोठी पंचाईत होते. अशावेळी कोणाला संपर्क करता येत नाही किंवा मदत मागता येत नाही. अशावेळी टेन्शन येणे स्वाभाविक आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी ॲप्पल आणि सॅमसंगकडून एक नवा उपाय काढण्यात आला आहे. यामुळे चोरी झालेल्या फोनचे लोकेशन कळणार आहे. काय आहे हे नवे फीचर जाणून घ्या.

फोन चोरी झाल्यानंतर चोर बऱ्याचदा फोन लगेच स्विच ऑफ करतात, त्यामुळे बंद फोनचे लोकेशन ट्रॅक करणे अवघड जाते. पण आता सॅमसंग आणि ॲप्पलच्या नव्या ॲपमुळे बंद फोनचे लोकेशन देखील जाणून घेताय येईल. हे ॲप काही दिवसांपूर्वीच लाँच झाले आहे. या ॲप चे नाव ‘ट्रॅक इट इवन इट इज ऑफ’ आहे आणि याला ‘हैमर सिक्युरिटी एप्लीकेशन’ देखील म्हटले जाते. ॲप्पल आणि सॅमसंग युजर्स हे हे ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात. सॅमसंग आणि एप्पल युजर्स हे ॲप मोफत डाउनलोड करू शकतात. इतर कंपन्यांसाठी प्रीमियम ॲप उपलब्ध आहे, ज्यासाठी पैसे भरावे लागतात.

आणखी वाचा : ड्युअल सिममध्ये एअरटेलचे कार्ड वापरताय? फक्त नंबर चालू ठेवायचा असेल तर सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणते जाणून घ्या

‘ट्रॅक्ट इट इवन इट इज ऑफ’ ॲप वापरण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर ते उघडून लोकेशनची परवानगी द्या.
  • यानंतर परवानगीचे अनेक पर्याय येतील त्यांना परवानगी द्या
  • आता ऍक्टिव्ह डिवाइस ऍडमिन अ‍ॅप्सवर क्लिक करा.
  • नंतर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर टाकण्याचा पर्याय निवडून त्यात तुमच्या जवळच्या व्यक्तींचा नंबर टाका
  • त्यानंतर पहिल्या पर्यायावर क्लिक करून फेक शटडाउन ऑन करा.

या स्टेप्स फॉलो केल्यानंतर जेव्हा तुमचा फोन चोरीला जाईल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्ही ॲड केलेल्या नंबरवर पाठवले जाईल. चोर सर्वात आधी फोन बंद करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून त्याला ट्रॅक करता येणार नाही. पण तुम्ही फेक शटडाउन ऑन केल्यामुळे फोन बंद झाला आहे असे चोराला वाटेल, पण फोन चालूच असेल. या ॲपच्या मदतीने तुम्ही ॲड केलेल्या नंबर वर फोनचे लोकेशन पाठवण्यात येईल. अशाप्रकारे चोरी झालेल्या फोनचे लोकेशन तुम्ही शोधू शकता, तसेच ही माहिती पोलिसांना देऊ शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या