भारतातील अग्रगण्य स्मार्टफोन ब्रँड सॅमसंग आपला नवा स्मार्टफोन लवकरच लॉंच करणार आहे. सॅमसंगने Galaxy F23 5G स्मार्टफोन लॉंच करणार असल्याची घोषणा केली आहे. गॅलेक्सी एफ२३ ५जी हा सॅमसंगचा २०२२ सालचा पहिला एफ सीरिज स्मार्टफोन असेल. हा स्मार्टफोन मंगळवार ८ मार्चला सादर केला जाईल. या फोनची विक्री फ्लिपकार्टवर केली जाणार आहे. यासाठी फ्लिपकार्टवर मायक्रोसाइटही तयार करण्यात आले आहेत.

गॅलेक्सी एफ२३ ५जी स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ७५०जी प्रोसेसरद्वारे समर्थित असेल, जो एफ मालिका स्मार्टफोनवरील पहिला स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. तसेच, स्मार्टफोनमध्ये प्रथमच गोरिला ग्लाससह १२०Hz रिफ्रेश रेटचा भव्य FHD+ डिस्प्ले असेल. ज्यांना गेमिंग आणि कंटेंट स्ट्रीमिंग आवडते त्यांच्यासाठी हा फोन अधिक चांगला असेल असा कंपनीचा दावा आहे.

२०२०मध्ये Youtuber नी भारतीय GDP मध्ये दिले ६,८०० कोटींचे योगदान

गॅलेक्सी एफ२३ ५जी स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच, हा फोन इन्फिनिटी व्ही डिस्प्लेसह येईल. सॅमसंगने नवीन फोनच्या किमतींबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. टेक एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की सॅमसंग गॅलेक्सी एफ२३ ची किंमत २०,००० रुपयांपेक्षा कमी असू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सॅमसंगने गेल्या वर्षी गॅलेक्सी एफ सिरीजमधील स्मार्टफोनची एक मालिका लॉन्च केली होती. या मालिकेतील पहिला स्मार्टफोन गॅलेक्सी एफ४२ ५जी होता. या फोनची सुरुवातीची किंमत २०,९९९ रुपये होती, तर टॉप मॉडेलची किंमत २२,९९९ रुपये होती.