सॅमसंग ही एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स आकर्षक फीचर्ससह लाँच करत असते. तसेच ही कंपनी आता अन्य गोष्टींचे प्रॉडक्ट देखील तयार करते. Samsung TT7 शिल्ड एक पोर्टेबल सॉलिड स्टेट ड्राइव्ह (SSD) आहे.जी कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरमध्ये तुमच्या महत्वाच्या फाईल्ससाठी अतिशय वेगाने डेटा ट्रान्सफर आणि अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते. याच दृष्टीने याचे डिझाईन तयार करण्यात आले आहे.

सॅमसंग कंपनीने अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर निळ्या रंगांची T7 शील्डचे रचनात्मक फोटो शेअर केले आहेत. तर याची तुलना वापरकर्त्यांनी रीन डिटर्जंट साबणासारखी करून दिली आहे. कमेंटमध्ये अनेक लोकांनी विनोद केला की त्यांना असे वाटत की ही एसएसडी खरोखरच एक रीन डिटर्जंट बार किंवा इतर प्रकारचा एक साबण आहे. काहींनी तर त्याला डिटर्जंट एसएसडी’ असे नावही दिले आहे.

हेही वाचा : Google Layoffs: Google ने कामावरून काढून टाकताच महिला झाली भावूक; म्हणाली, “बॉसला फोन केला अन्…”

जेव्हा मी हा फोटो पहिला तेव्हा मला वाटले की सॅमसंग रिनशी स्पर्धा करत आहे, पहिल्यांदा पाहिल्यावर ते रीन आणि सर्फ एक्सएल बार सारखे दिसले. मी विचार करत होतो की सॅमसंग डिटर्जंट साबण का तयार करेल ? अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स नेटकऱ्यानी या शिल्डवर केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहेत फीचर्स ?

ड्राइव्हमध्ये कॉम्पॅक्ट, हलके डिझाइन आणि जाड रबर असे फीचर्स आहेत. यामध्ये विविध उपकरणांशी कनेक्टिव्हिटीसाठी USB-C ते USB-C केबल आणि USB-C ते USB-A केबल देखील असणार आहेत.