SBI ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे आणि फसवणूक टाळण्यासाठी सरकारी बँक सहसा त्यांच्या नवीन सेवा आणि ग्राहकांच्या कामाची माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतात. पण आता काही दिवसांपासून एसबीआय त्या प्रोडक्ट्सची माहितीही देत ​​आहे, ज्यांच्या खरेदीवर एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे सूट मिळू शकते. सध्या SBI क्रेडिट कार्डद्वारे टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन इत्यादी LLoyd प्रोडक्ट्सच्या खरेदीवर १७.५ टक्के कॅशबॅक मिळतोय. SBI कार्ड युजर्ससाठी उपलब्ध असलेल्या या ऑफरबद्दल आम्ही तुम्हाला सर्व काही सांगणार आहोत…

जर तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला लॉयड कंपनीचे प्रोडक्ट्स खरेदी करण्यावर चांगली सूट मिळेल. एसबीआयची ही ऑफर गुरुवार, ३० जूनपर्यंत वैध आहे. ३० जूनपर्यंत लॉयडच्या उत्पादनांवर उपलब्ध असलेले हे डिस्काउंट फक्त ईएमआय ट्रांजेक्शनवर वैध आहेत. म्हणजेच जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील, तर तुम्हाला टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी यांसारखी लॉयडची प्रोडक्ट्स ईएमआयवर खरेदी करावी लागतील. याशिवाय, SBI ची ही ऑफर कंपनीच्या निवडक प्रोडक्ट्सवरच लागू आहे.

आणखी वाचा : पुढच्या महिन्यात लॉंच होणार Nothing, OnePlus, Realme चे पॉवरफुल आणि प्रीमियम फोन

SBI क्रेडिट कार्ड ग्राहकांनी ३० जून २०२२ पर्यंत लॉयडची निवडक प्रोडक्ट्स खरेदी केल्यास त्यांना EMI ट्रांजेक्शनद्वारे ६००० रूपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. या ऑफर अंतर्गत एका क्रेडिट कार्डवर कमाल कॅशबॅक मर्यादा ६००० रुपये आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा लाभ सर्व SBI क्रेडिट कार्डवर मिळू शकतो. परंतु ही ऑफर कॉर्पोरेट कार्ड्स आणि पेटीएम एसबीआय क्रेडिट कार्ड्सवर लागू होत नाही.