तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवे शोध समोर येत आहेत. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी जगातील पहिला जिवंत रोबोट बनवण्यात यश मिळवलं होतं.अफ्रिकेतील बेडकाच्या स्टेमसेलपासून हा रोबोट तयार करण्यात आला होता. हा रोबोट पहिल्यांदा २०२० मध्ये तयार करण्यात आला होता. वर्मोट युनिव्हर्सिटी, टफ्ट्स युनिव्हर्सिटी आणि हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या वायस इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकलली इन्स्पायर्ड इंजिनिअरिंगमधील शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. या रोबोटला जेनोबोट्स असं नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा रोबोट प्रजनन करू शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. मात्र प्रजनन प्रक्रिया प्राणी आणि वनस्पतींपेक्षा वेगळी आहे. विशेष म्हणजे, शास्त्रज्ञांनी जैविक पुनरुत्पादनाचा एक वेगळा प्रकार शोधला आहे, जो प्राणी किंवा वनस्पतीपेक्षा वेगळा आहे. अनेक एकल पेशी एकत्र करून हा रोबोट स्वतःचे शरीर तयार करू शकतो.

नवीन शोध वैद्यकीय क्षेत्रात उपयुक्त ठरू शकेल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. हा रोबोट त्यांच्या तोंडात एकल पेशी गोळा करतात आणि त्यांच्यासारखे दिसणारे बाळ तयार करू शकतात.शास्त्रज्ञ जोशुआ बोन्गार्ड यांनी सांगितले की, झेनोबॉट्स चालू शकतात, झेनोबॉट्स पोहू शकतात हे आम्ही आधीच पाहिले आहे, आता ते त्यांची संख्या देखील वाढवू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेनोबोट्स ही सुरुवातीचं तंत्रज्ञान असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. १९४० च्या संगणकाचा विचार करता अद्याप व्यवहारिक वापर होणार नाही. मात्र भविष्यात आण्विक जीवशास्त्र आणि कृत्रिम इंटेलिजेंसचा उपयोग शरीर आणि पर्यावरणाशी निगडीत काम करण्यास करता येईल.