शेअरचॅटमध्ये लवकरच नोकरकपात करण्यात येणार आहे. शेअरचॅट, मोज यांची मुळ कंपनी असणाऱ्या मोहल्ला कंपनीमध्ये २० टक्के कर्मचारी कपात होणार आहे, ज्यामुळे ४०० कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. याची माहिती कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या पत्रात दिली आहे.

या नोकरकपातीबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना शेअरचॅटचे प्रवक्ता म्हणाले, “या कंपनीच्या इतिहासातील काही कठीण निर्णय घ्यावे लागत आहेत. ‘एक्सटर्नल मॅक्रो फॅक्टर’मुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे. कंपनीशी जोडलेल्या २० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येत आहे.

आणखी वाचा: बड्या ‘टेक’ कंपन्या इतकी घाऊक कर्मचारी कपात करतात, हे लक्षण कशाचं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय स्टार्टअप्सच्या अत्यंत कठीण काळात ही नोकरकपात करण्यात येत आहे. जे स्टार्टअप्स सुरूवातीला सुरक्षित आणि जास्त पगार दिले जाणारे मानले जात होते, ते आता नोकरकपात करत आहेत. ओला, ओयो, डनझो, ब्लिंक इट, बायजुज यांसारख्या कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये नोकरकपात जाहीर केली आहे.