उन्हाळ्यात वीजबिल हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. तासंतास एसी-कूलर चालवल्याने जास्त वीज वापरली जाते आणि वीजबिलही जास्त येते. अशा परिस्थितीत ते कमी करण्यासाठी आपण विजेचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. वेळेच्या कमतरतेमुळे अनेक वेळा आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो ज्यामुळे वीज बिल निम्म्याहून कमी होऊ शकते. आज आपण वीज बिल कमी करण्याचे सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारणपणे उन्हाळ्यात वीज बिलात लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येते. वीज बिल वाढल्यामुळे महिन्याचे बजेट बिघडते. जर तुम्हालाही जास्त वीज बिलाची समस्या येत असेल तर तुम्हाला फक्त घरातील काही उपकरणे बदलावी लागतील.

Photos : जाणून घ्या, Nikeच्या Adapt BB Smart Shoesचे स्मार्ट फीचर्स

सामान्य बल्ब जास्त वीज वापरतो

तुम्ही अजूनही जुने बल्ब वापरत असाल तर ते आताच बदला. हे बल्ब विजेचे बिल झपाट्याने वाढवतात. ते बदलून आपण वीज वापर कमी करू शकता. त्याऐवजी घरात एलईडी बल्ब वापरणे सुरू करा. एलईडी बल्ब विजेचा वापर कमी करून तुम्हाला भरमसाठ बिलांपासून वाचवू शकतो.

अशा प्रकारचे एअर कंडिशनर वापरणे टाळा

उन्हाळ्याच्या दिवसात एसीचा वापर सर्रास होतो. जर तुम्ही जास्त क्षमतेचा एसी वापरत असाल तर तो गरजेच्या वेळीच चालू करा. उच्च क्षमतेचे एसी मोठ्या प्रमाणात वीज वापरतात आणि त्याचा थेट परिणाम बिलावर दिसून येतो.

Google Maps चालणार इंटरनेटशिवाय; जाणून घ्या, नकाशे ऑफलाइन डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

जुन्या पद्धतीचा एसी

आजही अनेक घरांमध्ये जुना एसी वापरला जातो. त्यामुळे खूप वीज लागते. विजेचा जास्त वापर केल्यास बिलात वाढ होईल. त्यामुळे जुन्या एसीऐवजी आजच ५ स्टार रेटिंग असलेला नवीन एसी घ्या. ५ स्टार रेटिंग असलेले एसी कमी वीज वापरतात ज्यामुळे तुम्ही तुमचे वीज बिल कमी करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small changes big financial benefits here are some tips to help you reduce your light bill pvp
First published on: 10-05-2022 at 11:14 IST