स्मार्टफोनमध्ये सुरुवातीला म्युझिक (Music) हा एक ॲप इनबिल्ट असायचा, ज्यात प्रत्येक जण त्यांची आवडीची गाणी डाऊनलोड करून ऐकत होते. तर आता यूट्यूब म्युझिक, स्पॉटिफाय (Spotify) आदी विविध ॲपवर आपण ऑनलाइन गाणी ऐकतो. पण, सोमवारी या लोकप्रिय म्युझिक स्ट्रिमिंग स्पॉटिफाय प्लॅटफॉर्मने जाहीर केले की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील कर्मचारी संख्या १७ टक्क्यांनी कमी करणार आहेत. तर आता नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे.

१५०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय कंपनीच्या या निर्णयानंतर एक्स कर्मचाऱ्याने त्याला नोकरीवरून काढून टाकण्याचा अनुभव शेअर केला आहे. कर्मचाऱ्याला सकाळी ७ वाजता ई-मेलवर संदेश पाठवण्यात आला. त्यात त्याला कामावरून काढून टाकले आहे असे नमूद करण्यात आले होते. स्पॉटिफाय कर्मचाऱ्याने LinkIndia वर त्याचा अनुभव शेअर केला आहे. कर्मचाऱ्याने सांगितले की, तो १६ वर्षांचा असल्यापासून ही त्याची ड्रीम कंपनी होती. पण, अखेर त्याने त्याचा जॉब गमावला आहे.

हेही वाचा…सिमकार्ड खरेदी-विक्रीमध्ये होणार मोठे बदल; कोणते नियम बदलणार आणि केव्हापासून लागू होणार? जाणून घ्या…

स्पॉटिफाय कर्मचाऱ्याने त्याच्या भावना LinkedIn वर पोस्टमध्ये शेअर केल्या आणि लिहिले की, हे इतक्या लवकर घडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. काल मी नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता उठलो. कामाच्या आधी माझा क्रॉसफिट वर्कआउट करण्यासाठी मी माझा फोन तपासला, तेव्हा एका सहकारी आणि मित्राने मला दिवसाच्या शुभेच्छा देणारा मजकूर पाठवला होता. गोंधळून मी माझा ई-मेल तपासला आणि लक्षात आले की, स्पॉटिफाईच्या काढून टाकणाऱ्या १५०० कर्मचाऱ्यांच्यामध्ये मीसुद्धा एक आहे”, असे त्याने लिहिले. कर्मचाऱ्याने पुढे सांगितले की, स्पॉटिफाय कंपनीचा भाग बनणे हे त्याच्यासाठी एक स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. तो १६ वर्षांचा असल्यापासून स्पॉटिफाय प्लॅटफॉर्मचा चाहता होता. त्यानंतर त्याने इथपर्यंत पोहचण्यासाठी कर्मचाऱ्याला मदत करणाऱ्या लोकांचे आभार मानले आणि सांगितले की, जे घडलं आहे ते स्वीकारण्यासाठी थोडा वेळ जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पॉटिफाय प्लॅटफॉर्मचे सीईओ डॅनियल यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे सोमवारी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. स्पॉटिफाय प्लॅटफॉर्म सुमारे १,५०० कर्मचारी किंवा १७ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. हा मोठा बदल कंपनीचा वाढता तोटा कमी करून तिला फायद्यात आणण्यासाठी घेण्यात आला आहे. तसेच एका कर्मचाऱ्याला ई-मेलद्वारे नोटीस पाठवून त्यांनी या प्रक्रियेला सुरुवात केली आहे आणि कर्मचाऱ्यानेदेखील या निर्णयावर त्याची भावूक पोस्ट शेअर केली.