OpenAI ने ChatGpt लॉन्च केल्यापासून AI विकसित करण्याची टेक कंपन्यांमधील स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ChatGpt चॅटबॉट शी स्पर्धा करण्यासाठी Google ने देखील Bard लॉन्च केले होते. मात्र गुगलच्या bard ला १०० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. त्यानंतरच्या खडतर सुरुवातीनंतर अल्फाबेट कंपनी आपला चॅटबॉट वाढवण्याचा विचार करत आहे तसेच त्याची कार्यक्षमता सुधारण्यासाठी नवीन पद्धती लागू करत आहे. कंपनीने यापूर्वीच बार्डची टेस्टिंग सुरु केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिझनेस इनसाईडरच्या एक नवीन नवीन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की सिंडर पिचाई यांनी एका मेमोमध्ये गुगलच्या कर्मचार्‍यांना चॅटबॉटची चाचणी करण्यात मदत करण्यासाठी दररोज दोन ते चार तास देण्यास सांगितले आहे. कंपनी याबद्दल त्यांच्या कमर्चाऱ्यांना पुढील आठवड्यात सविस्तर योजना देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गुगल ही प्रॉडक्ट लॉन्च करणार काही पहिली कंपनी नाही असे पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.

हेही वाचा : Google Layoffs: गुगलने ४५३ भारतीयांना कामावरून काढलं, सुंदर पिचाई म्हणाले…

सीईओ सुंदर पिचाई यांनी बार्डच्या लॉन्चच्या वेळी झालेल्या नुकसानीच्या क्षणांचा उल्लेख ‘अस्वस्थ आणि रोमांचक’ असा केला. मला माहिती आहे की, हा क्षण अस्वस्थ करणारा आणि रोमांचक देखील आहे. टेक्नॉलॉजी ही अपेक्षेपेक्षा जास्त क्षमतेने विकसित होत आहे असे कंपनीला पाठवलेल्या मेलमध्ये पिचाई यांनी लिहिले आहे. तसेच या ईमेलमधून पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना आशावादी राहण्यासाठी सांगितले आहे. पिचाई म्हणाले की, AI हे अनेक कठीण प्रसंगातून गेले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला एक सर्वोत्तम प्रॉडक्ट तयार करण्यावर आणि जबाबदारीने विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

Google चे सर्च मार्केटमध्ये वर्चस्व आहे.२००० च्या दशकाच्या सुरुवातीस बाजारात अनेक सर्च इंजिन अस्तित्वात होती. मात्र आता ९० टक्के बाजारपेठ ही गुगलने व्यापली आहे. गेल्या आठवड्यात गुगल बार्ड लॉन्च झाल्यानंतर, कर्मचाऱ्यांनी याला घाईत उचलेले पाऊल असे वर्णन केले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sundar pichai tells google employees to spend 4hours fotr make a bard tmb 01
First published on: 22-02-2023 at 19:10 IST