scorecardresearch

स्वस्तात मस्त टेक्नोचा ‘हा’ स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह भारतात लाँच; किंमत फक्त…

जर तुम्हाला स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

स्वस्तात मस्त टेक्नोचा ‘हा’ स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह भारतात लाँच; किंमत फक्त…
Photo -Jansatta

टेक्नोने भारतीय बाजारपेठेत एक नवीन स्वस्तात मस्त असा स्मार्टफोन ‘Tecno Pop 6 Pro’ सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ८MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, ६.५६-इंचाचा HD+ डॉट नॉच डिस्प्ले आणि ५,०००mAh बॅटरी आहे. नवीन लाँच केलेला पॉकेट-फ्रेंडली स्मार्टफोन आता अॅमेझॉन इंडिया वेबसाइटवर भारतात खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Tecno Pop 6 Pro 5G चे स्पेसिफिकेशन

Tecno Pop 6 Pro मध्ये १६१२ x ७२० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.६-इंचाचा HD+ डिस्प्ले, ४८० nits पर्यंत कमाल ब्राइटनेस आणि १२०Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. यात MediaTek Helio A२२ प्रोसेसर आहे. नवीन स्मार्टफोन Android १२ वर आधारित HiOS ८.६ वर चालतो.

फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये ८MP AI रियर कॅमेरा आहे, जो ड्युअल फ्लॅशसह येतो. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी तुम्हाला ५MP AI फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.

आणखी वाचा : चार्जिंगच्या समस्येपासून अशी मिळवा सुटका; फक्त ५४९ रुपयांमध्ये विकत घ्या पॉवर बँक, पाहा यादी

Tecno Pop 6 Pro 5G किंमत

Tecno Pop 6 Pro 5G भारतात फक्त एकाच स्टोरेज प्रकारात सादर करण्यात आला आहे – २ जीबी रॅम आणि ३२ जीबी अंतर्गत स्टोरेज. त्याचा स्टोरेज पर्याय मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. भारतात या स्मार्टफोनची किंमत ६,०९९ रुपये आहे, जी पीसफुल निळा आणि पोलर अशा काळ्या रंगामध्ये सादर करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या