आजकाल एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाबाबत जगभरात मोठ्या गोष्टी घडत आहेत. AI चे नवीन टूल ChatGPT मुळे मानवी जीवन खूप सुकर आणि सोप्या होतील अशा विविध गोष्टी घडू लागल्या आहेत. पण AI तंत्रज्ञानावर काम करणारे आणि त्याची निर्मित करणारे जेफ्री हिंटन, ज्यांना जग AI चे गॉडफादर म्हणून ओळखते. त्यांनी या तंत्रज्ञानाचे धोके समजावून सांगत आपल्या कामाबद्दल खंत व्यक्त केली आहे. हिंटन यांनी नुकताच गुगल कंपनीमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला.
जेफ्री हिंटन यांना २०१८ मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्स क्षेत्रातील कार्यासाठी त्यांच्या सहाय्यकांसह ट्यूरिंग अवॉर्ड जिंकला. तेव्हापासून AI तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती सुरु झाली. यावर आता हिंटन म्हणाले की, त्यांना त्यांच्या आयुष्यातील कामातील एका गोष्टीची चिंता सतावतेय. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हिंटन यांनी एआयमधील अडचणींबाबत खुलासा केला आहे.
AI चा गैरवापर हे मोठे आव्हान
जेफ्री हिंटन यांनी न्यूरल नेटवर्क्सवरील त्यांच्या चांगल्या कामासाठी कम्प्यूटिंगमधील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. द व्हर्जने दिलेल्या वृत्तानुसार, हिंटन म्हणाले की, मी स्वत:ला समजावत राहतो की, जर मी AI वर काम केले नसते तर कोणीतरी ते केलेचं असते. पण या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्यापासून किंवा वाईट लोकांच्या हाती जाण्यापासून कसे रोखू शकतो, याबाबत चिंता सतावतेय. हिंटन हे गेल्या १० वर्षांहून अधिक काळ गूगलमध्ये काम करत होते.
हिंटन म्हणाले की, AI च्या क्षेत्रातील स्पर्धा थांबवणे अशक्य होऊ शकते, कारण इंटरनेटवर इतक्या खोट्या इमेज, फोटो, व्हिडीओ आणि टेक्स्ट कॉपी आहेत, ज्या पाहून यातील कोणत्या खऱ्या आणि कोणत्या खोट्या या ओळखणे कठीण आहे.
ChatGPT मुळे AI तंत्रज्ञानाला मिळाली चालना
हिंटन आणि त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी सुरु केलेली कंपनी अधिग्रहणानंतर Google मध्ये सामील झाली, त्यांचा एक विद्यार्थी OpenAI मध्ये मुख्य शास्त्रज्ञ बनला. यानंतर हिंटन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी एक न्यूरल नेटवर्क विकसित केले, ज्याद्वारे हजारो फोटोंचे विश्लेषण केले जे कुत्रा, मांजर, कार आणि फुले यासारख्या सामान्य वस्तू ओळखण्यास शिकवत होते. याच कामातून अखेरीस ChatGPT आणि Google Bard ची निर्मिती झाली.
हिंटन यांनी उपस्थित केलेल्या चिंतेवर गुगलचे मुख्य शास्त्रज्ञ जेफ डीन म्हणाले की, आम्ही अशा धोका कमी करण्यासाठी AI तंत्रज्ञानाकडे जबाबदार दृष्टिकोन राखण्यासाठी वचनबद्ध आहोत. निर्भयपणे नवनवीन काम करत असताना आम्ही भविष्यातील जोखीम समजून घेण्यास सतत शिकत आहोत.