गुगल मॅपमुळे एखादं ठिकाण शोधणं सोपं झालं आहे. त्यामुळे वेळेची बचत होते आणि चुकीच्या ठिकाणी जाण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे हल्ली लोकांना पत्ता विचारण्याऐवजी गुगल मॅपवर लोकेशन सेट करून जाता येतं. त्यामुळे गुगल मॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतंच असतं. आता गुगल मॅप अ‍ॅपच्या माध्यमातून चालकांना आणखी एक मदत होणार आहे. वाहतुकीचे नियम मोडू नये यासाठी अलर्ट करणार आहे. या नियमांचं तंतोतंत पालन केलं तर वाहतूक पोलिसांना दंड भरण्याची आवश्यकता नसेल. मात्र या फिचरबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. गुगल मॅपमध्ये स्पीड लिमिट वॉर्निंग असं फिचर आहे. कारण वेग मर्यादा ओलांडल्याने वाहतूक पोलिसांकडून दंड भरावा लागतो. आजकाल शहरातील नाक्यानाक्यंवर स्पीड कॅमेरे मात्र गाडी चालवताना जर वेग मर्यादा ओलांडत असू तर हे फिचर अलर्ट देणार आहे. हा मॅसेज स्क्रिनवर येईल. त्यामुळे वेग मर्यादा आटोक्यात आणता येईल.

वेगाने गाडी चालवल्याने सर्वाधिक अपघात होत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्यामुळे या फिचरच्या मदतीने वेगावर मर्यादा आली तर अपघात टळणार आहे. जेव्हा तुम्ही या अ‍ॅपच्या माध्यमातून नेव्हिगेशन वापरता, तेव्हा रस्ता दाखवताना स्पीड बाबतही सूचना मिळणार आहे. Google Map चा स्पीडोमीटर रंग बदलतो आणि तुम्हाला इशारा देतो. स्क्रीनवर प्रवासाच्या कालावधीच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात वेग मर्यादा विभागात हा रंग बदलणारा प्रॉम्प्ट तुम्हाला दिसेल.

रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार २ लाख रुपयांची भरपाई, केंद्र सरकारचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसा वापर कराल? जाणून घ्या
गुगल मॅपचे हे फिचर वापरण्यासाठी प्रथम तुमचे गुगल मॅप अ‍ॅप्लिकेशन ओपन करा. उजव्या आणि वरच्या बाजूला केलेल्या प्रोफाइल फोटोच्या विभागात जा. येथे तुम्हाला सेटिंगचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. यानंतर, नेव्हिगेशन सेटिंग्जवर जा आणि स्पीड लिमिट बटण चालू करा. तुम्ही फिचर चालू करताच, स्पीडोमीटर फिचर कार्य करण्यास सुरवात करेल आणि तुम्हाला सूचना मिळण्यास सुरुवात होईल.