इन्स्टाग्राम आपल्या वापरकर्त्यांना स्टोरीजवर रिअ‍ॅक्ट करण्यासाठी अनेक पर्याय देते. वापरकर्ते दुसऱ्यांच्या स्टोरीजवर क्विक रिअ‍ॅक्शन, GIF आणि डायरेक्ट मेसेजच्या मदतीने प्रतिक्रिया देऊ शकतात. यासगळ्या प्रतिक्रिया डीएमच्या स्वरूपात शेअर केल्या जातात. परंतु आता, स्टोरीवर प्रतिक्रिया देण्यासाठीच्या नवीन पद्धतीवर कंपनी सध्या काम करत आहे.

रिव्हर्स इंजिनिअरिंग अ‍ॅपचे लोकप्रिय डेव्हलपर, अ‍ॅलेसॅन्ड्रो पलुझी यांच्या मते, हे फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप एका अशा वैशिष्ट्यावर काम करत आहे जे इंस्टाग्राम वापरकर्त्यांना व्हॉइस मेसेज वापरून स्टोरीजवर प्रतिक्रिया देण्याची अनुमती देईल.

या Viral Photo मध्ये लपलेली मुलगी शोधणे इतके सोपे नाही; तुम्हीही करून पाहा प्रयत्न

डेव्हलपरने शेअर केलेल्या आगामी वैशिष्ट्याचा स्क्रीनशॉट दर्शवितो की मेसेज बारमधील GIF पर्यायाशेजारी एखाद्या स्टोरीला प्रतिक्रिया देताना व्हॉइस नोट पाठवण्याचा पर्याय दिसेल. वापरकर्त्यांना, माइक आयकॉन दाबून ठेवून इन्स्टाग्राम स्टोरीला प्रतिसाद म्हणून व्हॉइस नोट रेकॉर्ड करता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनी बॅकग्राउंडमध्ये काम करणारी प्रत्येक फीचर लोकांसाठी रिलीज करत नाही. त्यामुळे, मुख्य अ‍ॅपमधील सर्व वापरकर्त्यांना स्टोरीजला प्रतिक्रिया देण्यासाठी कंपनी नवीन वैशिष्ट्य जारी करते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.