scorecardresearch

Location Tracking : मोबाईलमधून ‘या’ पद्धतीने तुम्ही करू शकता कोणाचेही लोकेशन ट्रॅक

या पद्धती वापरून लोकेशन ट्रॅक करता येऊ शकते.

Location Tracking : मोबाईलमधून ‘या’ पद्धतीने तुम्ही करू शकता कोणाचेही लोकेशन ट्रॅक
मोबाईलमधून 'या' पद्धतीने तुम्ही करू शकता कोणाचेही लोकेशन ट्रॅक (प्रातिनिधीक फोटो)

मोबाईल हे यंत्र आता जीवनावश्यक गोष्टींप्रमाणे महत्त्वाचे झाले आहे. मोबाईलमुळे आयुष्य सोपे झाले आहे. आपले मित्र किंवा कुटुंबातील मंडळी यांच्याशी सहजरित्या यामुळे संवाद साधणे शक्य झाले आहे. पण कधी कधी तांत्रिक बिघडामुळे आपल्या प्रियजनांशी संपर्क करता येत नाही. त्यावेळी ते कोणत्या अडचणीत तर सापडले नाहीत ना, किंवा त्यांचा मोबाईल हरवला तर नाही ना अशी शंका आपल्याला येते. अशावेळी काय करावे हे बऱ्याच जणांना माहित नसते आणि काळजीमध्ये असताना काही सुचत देखील नाही. त्यामुळे अशावेळी कोणत्या पद्धतीने त्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येऊ शकते जाणून घेऊया.

एखाद्या अनोळखी ठिकाणी जायचं असेल तर आपण सहज मोबाईलमध्ये लोकेशन ऑन करतो. त्यामुळे आपल्याला इच्छित स्थळी लगेच पोहोचण्यास मदत मिळते. पण तुम्हाला माहित आहे का याच प्रकारे आपण एखाद्या व्यक्तीचे लोकेशन देखील ट्रॅक करू शकतो. समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर जर माहित असेल तर स्मार्टफोन मधून लोकेशन ट्रॅक करणे सहज शक्य आहे. कोणत्या पद्धतीने लोकेशन ट्रॅक केले जाते जाणून घेऊया.

आणखी वाचा – Instagram वापरत असाल तर वेळीच व्हा सावध! तुमच्या प्रत्येक गोष्टीवर ठेवली जातेय नजर; पासवर्डही आहे असुरक्षित

टेलिकॉम कंपनीच्या साहाय्याने

लोकेशन ट्रॅकिंगची एक पद्धत टेलिकॉम कंपनीशी संबंधित आहे. टेलिकॉम कंपनी कोणत्याही ग्राहकाचे लोकेशन नंबरच्या साहाय्याने ट्रॅक करू शकतात. पोलीस आणि सरकारी एजन्सी याच पद्धतीचा वापर करून गुन्हेगारांचे किंवा अडचणीत सापडलेल्या व्यक्तींचे लोकेशन ट्रॅक करतात. टेलिकॉम कंपनी कोर्टाच्या आदेशानुसार त्या व्यक्तीच्या लोकेशनची माहिती पोलिसांना देतात. ही पद्धत केवळ सरकारी यंत्रणेसाठी उपलब्ध आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना ही पद्धत वापरता येत नाही.

ट्रूकॉलर ॲपद्वारे

ट्रूकॉलर ॲपद्वारे तुम्ही स्वतःच पोलीस किंवा टेलिकॉम कंपनीची मदत न घेता एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकता. यासाठी ट्रूकॉलर ॲपच्या सर्च बारवर त्या व्यक्तीचा फोन नंबर टाका. असे केल्यास ती व्यक्ती कोणत्या भागात आहे हे तुम्हाला लगेचच कळेल. अशाप्रकारे तुम्ही स्वतः कोणाचेही लोकेशन ट्रॅक करू शकता.

आणखी वाचा – Crush असो किंवा EX, कोणाचंही व्हॉट्सऍप स्टेट्स गुपचूप पाहता येणार; सेटिंगमध्ये फक्त ‘हे’ बदला

व्हाट्सॲप

लोकेशन ट्रॅक करण्याचा आणखी एक पर्याय आहे व्हाट्सॲप. पण यामध्ये समोरच्या व्यक्तीने त्यांचे लोकेशन शेअर करणे आवश्यक असते. जर त्यांनी लोकेशन शेअर केले तर तुम्हाला ते कुठे आहेत आणि ते कुठे प्रवास करत आहेत हे ट्रॅक करता येईल.

याशिवाय लोकेशन ट्रॅक करण्यासाठी काही विशेष ॲप्स देखील उपलब्ध आहेत. परंतु हे ॲप्स न वापरण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यातून तुमचा महत्त्वाचा डेटा चोरी होण्याची शक्यता असते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या