ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी तीन दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी ट्विटरचा लोगो बदलला होता. आता प्रसिद्ध निळ्या चिमणीऐवजी श्वानाचा लोगो ट्विटरसाठी त्यांनी वापरला होता. हा बदल पाहून वापरकर्ते हैराण झालेले पाहायला मिळत होते. त्यांनी याआधी आपला पाळीव कुत्रा शिबा इनू फ्लोकीला ट्विटरचे सीईओ बनवले होते. बदलानंतर, शिबा इनू ट्विटरच्या लोगोवर देखील दिसत होता. आता पुन्हा ट्विटरच्या लोगोची चर्चा सुरू झाली आहे. कारण प्रसिद्ध निळी चिमणी ट्विटरच्या लोगोवर परत आली आहे. आता ट्विटर खरोखर ट्विटरसारखे दिसत आहे.

तीन दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो Dogecoin लोगोमध्ये बदलून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. लोकांना वाटले होते की, Dogecoin लोगो काही तास राहील आणि नंतर काढून टाकला जाईल. मात्र तसे झाले नाही. आता Dogecoin लोगो हीच ट्विटरची ओळख असेल असे वाटत होते. मात्र हा लोगो केवळ वेब व्हर्जनमध्येच दिसत होता.

Image Credit -Twitter

हेही वाचा : Twitter Logo Changed : एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय, ट्विटरचा लोगो बदलला, नवा लोगो कोणता? पाहा…

ट्विटरचा बर्ड लोगो मस्क यांनी Dogecoin मध्ये बदलल्यावर मस्क यांनी देखील त्याची खिल्ली उडवली होती. एलॉन मस्क यांनी एक जुना स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये एका वापरकर्त्याने त्याला गंमतीने सांगितले की मस्क यांनी ट्विटर विकत घ्यावे आणि त्याचा लोगो डोगे असा करावा. हा स्क्रिनशॉट शेअर करताना ते म्हणाले, “आश्वासन दिल्याप्रमाणे” त्यांनी कंपनीचा लोगो बदलून दाखवला आहे. थोडक्यात वापरकर्त्याने दिलेले चॅलेंज मस्क यांनी पूर्ण करून दाखवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलून डॉगे का केला? यावर अद्याप कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाही. परंतु असे म्हणता येईल की मस्क हे केवळ डोगेकॉइन गुंतवणूकदारांकडून त्यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खटल्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. डोगेचा लोगो बदलून, त्यांना हे सिद्ध करायचे होते की डोगेबद्दलचे आपण केलेले ट्विट कोणाला फसवण्याचा प्रयत्न नव्हता.