Twitter ही एक सोशल मीडिया साईट आहे. याचे सीईओ ही एलॉन मस्क आहेत. मागच्या वर्षी मास्क यांनी ट्विटरची खरेदी केली होती. त्यांतर त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. यापुढेही अनेक बदल होण्याची शक्यता आहे. मग ते कर्मचाऱ्यांची कपातीचा निर्णय असो, किंवा blue tick हटवण्याचा निर्णय असो. असे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत. आतासुद्धा ट्विटर वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ट्विटर लवकरच वापरकर्त्यांसाठी Voice आणि Video चॅट चे फीचर आणणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्वीट करत ही घोषणा केली की प्लॅटफॉर्म लवकरच वापरकर्त्यांसाठी व्हॉईस आणि व्हिडिओ चॅटिंगचे फीचर आणणार आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना त्यांचा मोबाइल नंबर शेअर न करता सुद्धा ट्विटरवर कोणाशीही संवाद साधता येणार आहे.

हेही वाचा : Twitter युजर्ससाठी मोठी बातमी! लवकरच ‘ही’ अकाउंट्स होणार बंद, लॉग इन करा अन्यथा…

तसेच एलॉन मस्क यांनी ट्विटरवर काही प्रमुख फीचर्स जोडण्याची घोषणा केली.त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ही स्पष्ट केले, या नवीन फीचरचा वापर करून वापरकर्ते ट्विटरवरील इतर कोणत्याही वापरकर्त्याला व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करता येणार आहे.

हेही वाचा : Tech layoffs: मंदीचे सावट आणखी गडद; आता Linkedin करणार तब्बल ‘इतकी’ नोकरकपात

मस्क यांनी सांगितले एनक्रिप्टेड डायरेक्ट मेसेज (DMs) व्हर्जन १.० उद्या रिलीज होणार आहे. हे एन्क्रिप्शन इतके मजबूत आहे की त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली तरी तो वापरकर्त्याच्या डीएमचा कंटेंट पाहू शकणार नाही. ट्वीटरला सुपर App बनवण्याचे मस्क यांचे स्वप्न आहे. हे नवीन व्हॉईस आणि व्हिडिओ चॅटचे फीचर त्यांना त्यांच्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जाईल अशी अपेक्षा आहे.

ट्वीटर लवकरच Inactive अकाउंट्स बंद करणार असल्याची माहिती काल मस्क यांनी दिली. ट्वीटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोमवारी ट्वीट करून याबद्दल माहिती दिली. वर्षानुवर्षे निष्क्रिय असलेली अकाउंट्स बंद केली जाणार आहेत. दरम्यान ट्वीटरवर अशी हजारो अकाउंट्स आहेत , ज्यावर कोणतीही पोस्ट शेअर केली जात नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter ceo elon musk get soon video and voice calling feature for users tmb 01
First published on: 10-05-2023 at 10:04 IST