ट्विटर हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. मात्र ट्विटरचा सर्व्हर डाऊन झाला आहे. अनेक वापरकर्त्यांना त्यांचे अकाउंट लॉग इन करताना समस्या येत आहेत. त्यासोबतच Tweetdeck देखील काम करत नसल्याने वापरकर्ते त्यावरही लॉग इन करू शकत नाहीत. अनेक वापरकर्त्यानी याबाबत तक्रारी केली आहेत. मात्र आता हळूहळू ही समस्या दूर केली जात आहे. काही वापरकर्त्यांना ट्विटरवर लॉग इन करताना समस्या जाणवत आहे. याबद्दल कंपनीला खेद असून , त्यांच्या समस्या लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे.

माहितीनुसार, बुधवारी रात्री ट्विटरच्या वापरकर्त्यांना मायक्रोब्लॉगिंग साईटवर लॉग इन करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामध्ये ट्विट करणे, मेसेज पाठवणे किंवा नवीन अकाउंटला फॉलो करणे यामध्ये समस्या येत होत्या. नवीन ट्विट पोस्ट करणाऱ्यां वापरकर्त्यांना एक मेसेज दिसत होता की आम्ही तुमचे ट्विट पोस्ट करण्यास सक्षम नाही . तसेच मायक्रोब्लॉगिंग साईटवॉर नवीन अकाउंटला फॉलो करण्याचा प्रयत्न करत असलेल्या वापरकर्त्यांना तुमची नवीन लोकांना फॉलो करण्याची मर्यादा संपली आहे असा मेसेज येत होता.

हेही वाचा : Motorola SmartPhones: ६,९९९ रुपयांमध्ये लॉन्च झाला मोटोरोलाचा ‘हा’ स्मार्टफोन, मिळणार जबरदस्त फीचर्स

काही वापरकर्त्यांची सांगितले की, फक्त ट्विटरच्या ट्विट शेड्यूलिंग फीचरचा वापर करूनच ट्विट शेअर करता येत आहे. आउटेज ट्रॅकर DownDetector च्या मते ट्विटरच्या वापरकर्त्यांना गुरुवारी पहाटे तीन वाजल्यापासून या समस्या येऊ लागल्या. पहाटे ४ ते ४.३० च्या दरम्यान ८०० ते ८५० वापरकर्त्यानी ट्विटरवर येणाऱ्या समस्यांबद्दल तक्रार केली. यामध्ये ४३ टक्के वापरकर्ते अ‍ॅपवर, २५ टक्के वेबसाइटशी आणि १२ टक्के हे सर्व्हर कनेक्शनशी संबंधित आहेत.